शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

नक्षलग्रस्त भागात उभारणार २८ टॉवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:15 IST

गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना इंटरनेटच्या सेवेचा लाभ घेता यावा. माहितीचे आदानप्रदान करणे सुलभ व्हावे, नक्षली कारवायांना पायबंद लावण्यास मदत व्हावी, .....

ठळक मुद्देकनेक्टिव्हिटी वाढविणार : २०१२ च्या सर्वेक्षणातील १७ टॉवर सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना इंटरनेटच्या सेवेचा लाभ घेता यावा. माहितीचे आदानप्रदान करणे सुलभ व्हावे, नक्षली कारवायांना पायबंद लावण्यास मदत व्हावी, यासाठी नक्षलग्रस्त भागात तीन आणि जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात १५ मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहेत. तर यापूर्वी शासनाची मंजुरी मिळालेले १० टॉवर लवकरच उभारण्यात येणार आहे.केंद्र व राज्य सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून शहर आणि गावांना जोडण्याचा संकल्प केला आहे. दुर्गम भागात इंटरनेट, मोबाईलची सेवा मिळाल्यास या भागातील नागरिकांची पायपीट थांबेल.कामे वेळेत होण्यास आणि माहितीची आदान प्रदान करण्यास मदत होईल. तसेच नक्षलप्रभावीत भागात नक्षल्यांच्या कारवाया वेळीच हाणून पाडण्यासाठी सुध्दा या मोबाईल टॉवरची मोठी मदत होईल. केंद्र सरकारने कॅशलेसची संकल्पना पुढे आणली. मात्र कॅशलेस व्यवहार करण्यासाठी पाहीजे त्या प्रमाणात साधने उपलब्ध नसल्यामुळे कॅशलेस सेवेला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. शासनाने मोबाईलद्वारे पेटीएमच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन केले. परंतु त्यासाठी पर्याप्त साधने उपलब्ध होत नसल्यामुळे याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कव्हरेज राहात नसल्यामुळे हा व्यवहार होऊच शकत नाही. पंतप्रधानांनी कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. मात्र, सुविधांअभावी नागरिक कॅशलेस व्यवहार करण्यास असमर्थ ठरत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोबाईलला कव्हरेजच राहात नाही. बहुतांश ठिकाणी मोबाईल टॉवर नाहीत. जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असल्याने शासनाने सन २०१२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार कालीमाटी, कातुर्ली, टाकरी, लोहारा, पाथरी, मुंडीपार, जमाकुडो, फुक्कीमेटा, डवकी, येडमागोंदी, धाबेटेकडी, भरनोली, नवनीतपूर, बिजेपार, लटोरी, सोनेखारी व धानोरी या १७ ठिकाणी टॉवर उभारण्यात आले आहेत. नक्षलग्रस्त भागासाठी १० टॉवरला शासनाने मंजूरी दिली आहे. त्या टॉवरचे काम सुरू करण्यासाठी ई-निवीदा प्रक्रिया झाली आहे. त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. तर १८ नविन टॉवर उभारण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या १८ पैकी ३ टॉवर जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागात तर १५ टॉवर सीमा भागात उभारण्यात येणार आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे.