शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्ह्यात अडीच वर्षांत २७६३ गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:35 IST

जिल्ह्यात मागील अडीच वर्षात २७६३ अधिकृत गर्भपात करण्यात आले. विशेष म्हणजे गर्भपात करणाऱ्यांमध्ये अविवाहीत १११ तरुणींचा समावेश असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचा अहवाल : अनधिकृत केंद्रांकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील अडीच वर्षात २७६३ अधिकृत गर्भपात करण्यात आले. विशेष म्हणजे गर्भपात करणाऱ्यांमध्ये अविवाहीत १११ तरुणींचा समावेश असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. ही सर्व अधिकृत केंद्रावरील आकडेवारी असून वास्तविक आकडे यापेक्षा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्त्री भ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर विविध उपाय योजना राबविल्या जात आहे. मात्र यानंतरही मुलींचा घटता जन्मदर चिंतेचा विषय ठरत आहे. मुलगा-मुलगी यांच्यात भेदभाव न करता दोघांनी समान वागणूक तसेच मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचे आवाहन केले जात आहे. यासाठी व्यापक स्तरावर जनजागृती कार्यक्रम राबविले जात आहे. मात्र यानंतरही स्त्री भ्रूण हत्येला पूर्णपणे प्रतिबंध लागला नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. ती काहीशी खरी देखील असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये १२२५, २०१६-१७ मध्ये ८०९ आणि नोव्हेबर २०१७ पर्यंत ७२९ गर्भपात करण्यात आल्याची नोंद अधिकृत गर्भपात केंद्रामध्ये झाली आहे. जिल्ह्यात अधिकृत गर्भपात केंद्राची संख्या केवळ ६३५ आहे. यापेक्षा अधिक अनधिकृत गर्भपात केंद्राची संख्या असून गर्भपात करण्यासाठी ३० ते ३५ हजार रुपयांचा दर असल्याची माहिती आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील काही मोजक्याच खासगी रुग्णालयात अधिकृत गर्भपात केंद्रांची नोंद आहे. या रुग्णालयात केल्या जाणाºया गर्भपातांची अधिकृत नोंद व माहिती आरोग्य विभागाला सादर केली जाते. मात्र बहुतेक खासगी रुग्णालयात मोठी रक्कम घेवून गर्भपात करुन दिले जातात त्याची कुठलीही नोंद केली जात नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.या परिसराची चर्चाजिल्ह्यातील काही भागात अनधिकृत गर्भपात केंद्र सुरू आहेत. यात गोंदिया तालुक्यातील काटी, सडक-अर्जुनी आणि अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील पाच ते सहा गावांची नावे सध्या चर्चेत आहेत. मात्र मागील दीड वर्षांत एकाही अनधिकृत गर्भपात केंद्रावर कारवाई करण्यात आली नाही.आमच्या यंत्रणेकडे खात्रीलायक माहिती असल्याशिवाय कारवाई करता येत नाही. अधिकृत गर्भपात केंद्रांची नियमित तपासणी केली जाते.- डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा शल्य चिकित्सक गोंदिया