शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मलेरियाचे २७६ रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:26 IST

जिल्ह्यात डेंग्यू पेक्षा मलेरिया जास्त पाय पसरत असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्हा मलेरिया विभागाने तीन लाख २१ हजार २३४ रूग्णांची रक्ततपासणी केली असून त्यात २७६ रूग्ण मलेरिया ग्रस्त आढळून आले आहेत.

ठळक मुद्देनऊ महिन्यांतील आकडेवारी : सप्टेंबरपर्यंत डेंग्यूचे दोन रूग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात डेंग्यू पेक्षा मलेरिया जास्त पाय पसरत असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्हा मलेरिया विभागाने तीन लाख २१ हजार २३४ रूग्णांची रक्ततपासणी केली असून त्यात २७६ रूग्ण मलेरिया ग्रस्त आढळून आले आहेत.विशेष म्हणजे, सन २०१७ मध्ये तीन लाख ४३ हजार ८१४ रूग्णांची तपासणी केली असता त्यात ४४१ रूग्ण मलेरियाग्रस्त आढळून आले होते. डेंग्यूचे नाव घेताच थरकाप येणार अशी स्थिती आहे. मात्र जिल्ह्यात डेंग्यू पेक्षा मलेरियाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहे.जिल्ह्यात मागील वर्षी सन २०१७ मध्ये जिल्हा मलेरिया विभागाने तीन लाख ४३ हजार ८१४ रूग्णांची रक्त तपासणी केली होती. त्यात ४४१ रूग्ण मलेरियाग्रस्त आढळून आले. तर यावर्षी सन २०१८ मध्ये तीन लाख २१ हजार २३४ रूग्णांची रक्त तपासणी केली असता त्यात २३४ रूग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मलेरियाचे ७० रूग्ण आढळून आले होते.मात्र यावर्षी फक्त १० रूग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूबाबत मात्र मागील वर्षी फक्त एकच रूग्ण सप्टेंबर महिन्यापर्यंत आढळून आला होता. यंदा मात्र सप्टेंबर महिन्यापर्यंत दोन रूग्ण आढळून आले आहेत. हे दोन्ही रूग्ण कामानिमित्त बाहेर गेले होते व डेग्यूने ग्रस्त होऊन गावी परतून आले होते.यापुर्वी डेंग्यू संदर्भात रूग्णाचे रक्त नमुने नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते. मात्र यंदा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही सेवा उपलब्ध करविण्यात आली आहे.फायलेरिया शोध मोहीमयंदा १६ ते ३१ आॅगस्ट दरम्यान फायलेरिया शोध मोहीम राबविण्यात आली. यात आढळून आलेल्या रूग्णांची पुन्हा तपासणी केली जात आहे. यंदा फायलेरिया शोध मोहिमेची गुणवत्ता वाढविण्यात आली असून याच्या समूळ उपचार व शस्त्रक्रि येचा लाभ रूग्णांना उपलब्ध करवून दिला जात आहे. तर विविध उपाययोजनांच्या माध्यमातून स्क्रब टायफस रूग्णांची संख्याही कमी झाली आहे. नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून पाणी साठू देऊ नये असे जिल्हा मलेरिया अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी केले आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य