शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

जाळपोळ प्रकरणात २७२ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:35 IST

गोरेगाव तालुक्याच्या घोटी येथील सर्प दंशाने मृत्यू पावलेल्या आदित्य सुमेध गौतम (८) याला जिवंत करण्याची हमी देणाऱ्या डॉक्टरला उपचार का करू देत नाही म्हणून संतप्त लोकांनी गोरेगाव येथील दुर्गा चौकात जाळपोळ करून पोलिसांवर दगडफेक केली.

ठळक मुद्देखुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा : पोलिसांवर केली होती दगडफेक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरेगाव तालुक्याच्या घोटी येथील सर्प दंशाने मृत्यू पावलेल्या आदित्य सुमेध गौतम (८) याला जिवंत करण्याची हमी देणाऱ्या डॉक्टरला उपचार का करू देत नाही म्हणून संतप्त लोकांनी गोरेगाव येथील दुर्गा चौकात जाळपोळ करून पोलिसांवर दगडफेक केली.या दगडफेक करणाºया २७२ लोकांवर गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.१४ आॅक्टोबर रोजी गोंदियाच्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात सर्प दंशावर उपचार करण्यासाठी दाखल झालेल्या आदित्य सुमेध गौतम (८) याचा मृत्यू झाला. १५ आॅक्टोबरला त्याला अंत्यसंस्कारासाठी नेत असताना कटंगीधाम येथील डॉ.नवीन लिल्हारे याने त्याला जीवंत करून देतो मला जडीबुटी आणण्यासाठी वेळ द्या असे म्हटले. सोमवारी रात्री ११ वाजता जडीबुटी घेऊन लिल्हारे आदित्यच्या घरी पोहचला.त्यावेळी चमत्काराचा प्रयोग करून लोकांची फसवणूक केल्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु त्याला सोडण्यात यावे यासाठी पोलिसांविरूध्द नागरिकांनी आंदोलन उभे करून रस्ता रोको जाळपोळ व दगडफेक केली. पोलीस प्रशासन मुर्दाबाद अश्या घोषणाही आंदोलनकर्त्यांनी दिल्या. जमावाने बस क्र.एमएच ४० ए.क्यू.६१५० ची तोडफोड करून बसला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.या दगड फेकीत मनोज शयामलाल बोपचे (३०) रा. कालीमाटी हा जखमी झाला. या प्रकरणात आरोपींविरूध्द भादंविच्या कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३४१, ३५३, ३३२, ४२७ सहकलम ७ क्रिमीनल लॉ मेंडमेंट कायदा, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, सहकलम १३५ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.यांच्यावर केला गुन्हा दाखलया प्रकरणात सहेसराम गनिराम चौधरी, राजकुमार शिवचरण नेवारे, संजय प्रेमलाल राऊत, रजत उत्तम डोंगरे, शैलेश दार्वेकर, किसन राऊत, गोविंद रहांगडाले, नानेश्वर मस्के, दिलीप कतलेवार, बबलू बिसेन, बोवा भेलावे, मुक्ती फोटो स्टुडिओचा मालक, भैय्यालाल कुरंजेकर, जितू डोंगरे, रमेश सरजारे,राजू मेश्राम, रामू पटले, जोशीराम रहांगडाले, देवा चौधरी सर्व रा. घोटी, डोमा बारेवार रा. गोरेगाव, घनश्याम रमेश माहुरे रा. कमरगाव, दिनेश रामू उईके रा. म्हसगाव व इतर २५० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नरबळी प्रकरणात तिघांना अटकसर्पदंशाने मृत्यू पावलेल्या आदित्य गौतमला जिवंत करण्याचा दावा करणाºया डॉ. नविन लिल्हारे याने मृतदेह कडक झाला नाही, शरीर पिवळेपडले नाही, भुजा कापल्यावर रक्त येते असे सांगून त्याने त्याला जिवंत करण्याचा दावा केला. त्यामुळे आरोपी डॉ. नविन लिल्हारे,भूनेश लिल्हारे दोन्ही रा. कटंगी व डॉ. इंद्रकुमार बघेले रा. म्हसगाव या तिघांविरूद्ध महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व जादूटोणा लावण्याचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ चे कलम ३ (२) (२) (३) अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

टॅग्स :Policeपोलिस