शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

२.७० लाख पुस्तकांत बालके दंग

By admin | Updated: April 2, 2017 01:03 IST

विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागावी यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळांत वाचन कट्टा तयार केला.

नरेश रहिले  गोंदिया विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागावी यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळांत वाचन कट्टा तयार केला. अनेक वेळा वाचन दिवस, अक्षर सुधार कार्यक्रम राबविले. दप्तरविरहीत दिन पाळला गेला. जिल्ह्यातील बालकांसाठी पाठ्यक्रमाव्यतिरिक्त विविध संस्कारक्षम आणि वाचनिय अशी २ लाख ७० हजार २५९ पुस्तके गेल्या वर्षभरात उपलब्ध झाली आहेत. ती पुस्तके वाचण्यात ग्रामीण भागातील बालके रमल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी यासाठी अडीच लाख विद्यार्थ्यांसाठी ८ सप्टेंबर व १५ आॅक्टोबर या दोन दिवशी वाचन आनंद दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्ह्यात दप्तरविरहीत दिन वाचन आनंद दिन म्हणून सर्व शाळांमध्ये ३१ डिसेंबर २०१५ रोजी साजरा करण्यात आला. २ लाख ६० हजार विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी २६ लाख पुस्तकांचे वाचन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान १० पुस्तके वाचली. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना चित्ररूप गोष्टी हाताळण्यासाठी देण्यात आली. वाचन झालेल्या पुस्तकांवर शिक्षकांनी संवाद साधला. संगणक युगातही पुस्तक वाचण्याची सवय विद्यार्थ्यांना असावी यासाठी द्विभाषी बाल पुस्तके जिल्ह्यांना उपलब्ध करवून देण्यात आली आहेत. जिल्ह्यातील १०६९ शाळांमध्ये पाठ्यक्रमाव्यतिरिक्त वाचनिय अशी २ लाख ७० हजार २५९ पुस्तके उपलब्ध आहेत. शाळेच्या मधल्या सुटीत किंवा वेळ मिळेल त्यावेळी ती पुस्तके विद्यार्थी वाचत असतात. अनेक पुस्तके विद्यार्थी घरीही घेऊन जातात. वाचन आनंद दिनामुळे संगणक युगातील विद्यार्थी वाचन संस्कृतीकडे वळली आहेत. प्रेरणादायी कथा, चरित्र्यवान, महापुरूषांचे चरित्र व अनेक पुस्तके आहेत. वाचन संस्कृतीकडे विद्यार्थी वळावे यासाठी शासनाने पुढाकार घेऊन प्रत्येक शाळेत वाचनालय तयार करावे अशी अपेक्षा पालकांकडून केली जात आहे. मराठीसोबत इंग्रजीचे वाचन एकाच पुस्तकावर आधी मराठीत लिहीलेले वाक्य त्याखाली इंग्रजीत भाषांतर करून आहेत. अशी द्विभाषिक पुस्तके गोंदिया जिल्ह्यातील ४३६ शाळांत पुरविण्यासाठी ४० लाख ८२ हजार ९८ रूपये अनुदान देण्यात आले. केंद्र सरकारने ‘पढे भारत, बढे भारत’ या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४३६ शाळांना द्विभाषी पुस्तकांसाठी प्रत्येक शाळेला ९ हजार ३६३ रूपये दिले. विद्या प्राधीकरण पुणे यांनी प्रकाशित केलेली द्विभाषी पुस्तके खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.