शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

२६४ अल्पवयीन मुली पळून गेल्या; पोलिसांना सापडल्या २४७!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:30 IST

नरेश रहिले गोंदिया : बेपत्ता, अपहरण झालेल्या किंवा प्रियकराच्या आमिषाला बळी पडून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलींना शोधण्यात गोंदिया पोलिसांनी ...

नरेश रहिले

गोंदिया : बेपत्ता, अपहरण झालेल्या किंवा प्रियकराच्या आमिषाला बळी पडून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलींना शोधण्यात गोंदिया पोलिसांनी ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून उत्तम कामगिरी केली. सन २०१८ पासून आजपर्यंतची परिस्थिती पाहता ३२ अल्पवयीन मुले व २६४ मुली पळून गेल्या होत्या; परंतु आतापर्यंत गोंदिया पोलिसांनी १० ऑपरेशन मुस्कान राबवून ३० मुले व २४७ मुलींना शोधून काढले आहेत. आज घडीला २ मुले व १७ मुली पोलिसांना सापडल्या नाहीत. शोधून काढलेल्या मुला-मुलींना त्यांच्या मात्या-पित्यांच्या स्वाधीन केले.

भीक मागण्यासाठी लहान बालकांचे अपहरण करून मोठ्या शहरात नेले जाते. त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून भीक मागण्यास प्रवृत्त केले जाते. काहींना वाम मार्गाकडे वळविले जाते. १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या बेपत्ता किंवा अपहरणाचे प्रमाण पाहून राज्य शासन या बालकांना शाेधून त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यासाठी ऑपरेशन मुस्कान ही मोहीम राबवीत आहे. या ऑपरेशनसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात १ अधिकारी व २ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पोलीस आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानक, रुग्णालय, उद्यान, चौक, रेल्वे स्थानक व सार्वजनिक ठिकाणी फिरस्ते किंवा भीक मागणाऱ्या मुलांचा शोध गोंदिया पोलिसांनी घेतला.

...........................

अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटना

सन २०१८- ८२

सन २०१९- ९९

सन २०२०- ३९

सन २०२१- ४४

..............

मुली चुकतात कुठे?

१) आपण उपाशी राहून मुला-मुलींसाठी उन्हातान्हात राबणाऱ्या आई-वडिलांची जाणीव मुली ठेवत नसून नुसत्या आकर्षणापोटी अनोळखी मुलाच्या नादी लागतात.

२) आई-वडिलांनी त्यांचे करिअर घडविण्याच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी मोबाइलसारख्या वस्तू दिल्यात, तर त्याचा योग्य फायदा न घेता प्रेम जुळविण्यासाठी त्याचा वापर केला जातो.

३) आई-वडिलांच्या अज्ञानीपणाचा फायदा घेतात आणि सुशिक्षितांच्या घरची मुलगी शिकण्याच्या नावावर घराबाहेर पडल्यावर मित्र-मैत्रिणींच्या नादात वाया जात आहे.

................

मुला-मुलींचे चुकीचे पाऊल पडू नये म्हणून त्यांचे मित्र व्हा

- आई-वडिलांनी मुला-मुलींची प्रत्येक हौस पुरविणे गरजेचे नाही. त्यांना आवश्यक तेवढीच साधने उपलब्ध करून द्यावीत.

- मुले-मुली शाळेच्या नावावर किंवा शिकवणीच्या नावावर घराबाहेर असतात. त्यांची योग्य माहिती पालकांनी ठेवावी. आपल्या पाल्यांवर नजरही ठेवावी.

- आई-वडील मोबाइलमध्ये आणि मुले-मुली आपल्या मित्रांमध्ये मश्गूल राहत असतील तर मुला-मुलींच्या हातून सहजरीत्या चूक होऊ शकते. यासाठी मुला-मुलींना आपले चांगले मित्र बनवा.

- प्रत्येक घरात संवाद होणे आवश्य आहे. दररोजच्या संवादातून आपल्या मुला-मुलीचे पाऊल कोणत्या दिशेने जात आहे, याचा वेध पालकांना लागू शकतो.