शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

२६२ पोलीस कुटुंबांना मिळणार हक्काचा निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:52 IST

दिवसाचे २४ तास शिस्त, गस्त व बंदोबस्त करून नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांना हक्काची वसाहत नसल्याने पोलिसांना आपल्या कुटुंबाला घेऊन भाड्याच्या खोलीत राहावे लागत होते.

ठळक मुद्देपहिल्यांदाच मिळाला निधी : चार ठाण्यातील पोलिसांसाठी १४९ कोटी मंजूर

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवसाचे २४ तास शिस्त, गस्त व बंदोबस्त करून नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांना हक्काची वसाहत नसल्याने पोलिसांना आपल्या कुटुंबाला घेऊन भाड्याच्या खोलीत राहावे लागत होते. आ.गोपालदास अग्रवाल व पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील चार पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना हक्काची वसाहत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून १४९ कोटी रूपये राज्य सरकारने मंजूर केले आहे.जिल्ह्यात १६ पोलीस ठाणे आहेत. २४ तास लोकांचे संरक्षण करणाºया पोलिसांची स्वतंत्र वसाहत बहुतांश ठिकाणी नाही. ज्या ठिकाणी वसाहत आहे. त्या ठिकाणच्या जीर्ण इमारतीतून पाणी गळत होते. नाल्या घाणीने तुंबलेल्या होत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना त्या क्वार्टरमध्ये राहणे अवघड झाले होते. जोराचा वारा आल्यास छत कधी कोसळून पडेल याचा नेम नव्हता. पोलीस कर्मचाºयांना हक्काची वसाहत असावी, यासाठी मागील अनेक वर्षांपासून आ. अग्रवाल व पोलीस विभागाचा पाठपुरावा सुरू होता. विद्यमान पोलीस अधीक्षक पाटील भुजबळ यांनी पोलीस ठाणे व पोलिसांच्या वसाहतीचा तिढा सोडविण्यासाठी शासन स्तरावर सतत पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासन दरबारी लावून धरले. त्यामुळे जिल्ह्यातील ४ पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांच्या वसाहतीसाठी व जिथे पोलीस ठाण्याची इमारत नाही. त्यासाठी एकूण १४९ कोटी रूपये मंजूर केले आहे.गोंदिया शहर ठाण्यातील कर्मचाºयांसाठी वसाहत मनोहर चौकात असलेल्या जुन्या पोलीस वसाहतीमध्ये चार-ते पाच मजली इमारत बांधण्यासाठी ५१ कोटी रूपये मंजूर झाले आहेत. या वसाहतीचे काम करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुध्दा करण्यात आली आहे.गोंदिया शहर व रामनगर या दोन पोलीस ठाण्यातील १४० कर्मचाºयांसाठी ही इमारत राहणार आहे. रामनगर पोलीस ठाण्याची चार मजली इमारत व रावणवाडी पोलीस पोलीस ठाण्याची इमारत व रावणवाडीच्या ३८ कर्मचाºयांसाठी ५४ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. सालेकसा पोलीस ठाण्याची प्रशासकीय इमारत व १२ अधिकारी व ७२ कर्मचारी असे ८४ क्वार्टरकरीता ४४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या चारही पोलीस ठाण्यातील २६२ पोलीस कर्मचाºयांना हक्काची वसाहत मिळणार आहे.जमिनीची होती अडचणपोलिसांची वसाहत निर्माण करण्यासाठी जमिनीची अडचण होती. रावणवाडी येथील जमीन वनविभागाची असल्याने तिथे समस्या निर्माण झाली होती. या चारही पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसाठी आता जमिनीची समस्या मार्गी लागली आहे.फेज-२ मध्ये पुन्हा चार पोलीस ठाणेपहिल्या टप्यात गोंदिया जिल्ह्यातील १६ पैकी ४ पोलीस ठाणे घेण्यात आले. दुसऱ्या टप्यात आमगाव, तिरोडा, अर्जुनी-मोरगाव व नवेगावबांध या चार पोलीस ठाण्याच्या इमारती व कर्मचाऱ्यांच्यासाठी वसाहती निर्माण केल्या जाणार आहेत.त्यासाठी शासन स्तरावर सतत पाठपुरावा सुरू आहे.

टॅग्स :Policeपोलिस