शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चार विधानसभा क्षेत्रासाठी २६२ उमेदवारी अर्जांची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. सोमवारपर्यंत या चारही मतदारसंघातून एकूण २६२ उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली. तर आतापर्यंत केवळ एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअर्जुनी मोरगाव मतदारसंघात सर्वाधिक उचल : केवळ एक उमेदवारी अर्ज दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. सोमवारपर्यंत या चारही मतदारसंघातून एकूण २६२ उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली. तर आतापर्यंत केवळ एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.गोंदिया जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ असून राजकीय घडमोंडीना वेग आला आहे.युती आणि आघाडीने अद्यापही उमेदवार जाहीर केले नाही. त्यामुळे एकाही राजकीय पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रासाठी ४५ जणांनी १०१ अर्जाची उचल केली आहे. तिरोडा विधानसभा क्षेत्रासाठी २३ अर्जाची उचल करण्यात आली आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रासाठी १०४ अर्जाची उचल करण्यात आली आहे. त्यात एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. आमगाव विधानसभा क्षेत्रासाठी ३४ अर्जाची उचल करण्यात आली आहे. चारही विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारपर्यंत एकूण २६२ अर्जाची उचल करण्यात आली आहे. मतदारसंघनिहाय उमेदवारी अर्जांची उचल करणाऱ्यावर नजर टाकली असता सर्वाधिक अर्जांची उचल अर्जुनी मोरगाव मतदारसंघात तर सर्वात कमी अर्जांची उचल तिरोडा मतदारसंघातून करण्यात आली आहे.शेवटच्या दोन दिवसात होणार गर्दीयुती आणि आघाडीतर्फे जागा वाटपाचे चित्र दोन दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होणार आहे.बहुतेक राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी ३ किंवा ४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासन सुध्दा सज्ज झाले आहे. 

आता उत्सुकता केवळ उमेदवारांचीयुती आणि आघाडीच्या नेत्यांनी जिल्ह्यातील चारही मतदारसंघासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन उमेदवारांच्या याद्या तयार केल्या आहेत. निवडणुकी दरम्यान पक्षात बंडखोरी होऊ नये म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असतांना उमेदवारी जाहीर करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघाचा उमेदवार कोण याचीच आता सर्वांना उत्सुकता लागली आहे.

दिग्गज उमेदवार भरणार शेवटच्या दिवशी अर्जविधानसभा निवडणुकीसाठी ४ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे अधिकृत उमेदवार शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. शक्ती प्रदर्शन करण्यासाठी या तिन्ही पक्षांकडून नियोजन केले जात असल्याचे चित्र आहे.