शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

‘ओजस’ शाळेत २५ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:01 IST

विद्यार्थ्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शासकीय शाळांना आता चांगले दिवस येऊ लागले. मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग व शालेय शिक्षण विभागाच्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ठळक मुद्देतेजस शाळांचा विचार नाही : शहीद जान्या तिम्यात मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विद्यार्थ्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शासकीय शाळांना आता चांगले दिवस येऊ लागले. मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग व शालेय शिक्षण विभागाच्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गोरेगाव येथील शहीद जान्या-तिम्या जि.प.उच्च प्राथमिक शाळेत ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळा सत्र २०१८-१९ पासून सुरूवात करण्यात येत आहे. २५ विद्यार्थ्यांना नर्सरी ते केजी-२ चे शिक्षण दिले जाणार आहे.आंतरराष्ट्रीय शाळा तयार करण्याच्या पहिल्या टप्यात १३ शाळांची ओजस म्हणून निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय शाळांना महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या आंतरराष्ट्रीय कक्षातून मार्गदर्शन व सहकार्य मिळणार आहे. एक ओजस शाळेच्या अंतर्गत नऊ तेजस आंतरराष्ट्रीय शाळा तयार करण्यात येणार आहे. परंतु या तेजस शाळा संदर्भात विचार करण्यात आला नाही. राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी विदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी पुढाकार घेतला आहे.शाळा लोकसहभागावर चालणारओजस आंतरराष्ट्रीय शाळेची सुरूवात यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून होत आहे. शासनमान्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम राहील. ही शाळा लोकसहभागावर चालणार आहे. या शाळेसाठी राज्यस्तरीय संस्थेकडून चाचणी परीक्षेद्वारे गुणवंत शिक्षकांची निवड केली जाणार आहे. बालकांच्या सर्वांगीण बौद्धीक, शारीरिक व शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाणार आहे.आनंददायी कृतीतून मिळणार शिक्षणशासनमान्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम, दर्जेदार व गुणवत्तायुक्त शिक्षण, प्रशस्त वर्गखोल्या, मोठी पटांगणे, खेळणी साहित्य, तज्ञ महिला शिक्षिका,डिजीटल शिक्षण, वाहतूक व्यवस्था व आनंददायी कृतीतून शिक्षण दिले जाणार आहे.शाळांत भौतिक, शैक्षणिक व मूलभूत सोयी आंतरराष्ट्रीय ओजस शाळेत मिळतील. गोंदिया जिल्ह्यात ओजस शाळा निर्मीतीमुळे शासकीय शाळांमध्ये स्पर्धा निर्माण होईल. त्यासाठी पालकांनी शाळेत नाव दाखल करावे.- उल्हास नरड, प्राथमिक शिक्षणाधिकारी गोंदिया

टॅग्स :Schoolशाळा