शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यातून मध्य प्रदेशात जाणाऱ्या २५ फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 05:00 IST

राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. दररोज हजारोंच्या संख्येत बाधितांची संख्या वाढत चालली असून, कित्येक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची पाळी आली आहे. अशा स्थितीत प्रवाशांची ये-जा सुरू राहिल्यास त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच बाब हेरून मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातून तेथे जात असलेल्या बस फेऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देआंतरराज्य फेऱ्यांवर बंदी : शनिवारपासून सुरू झाली अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव बघता मध्य प्रदेश सरकारने येथील बस फेऱ्या बंद केल्या आहेत. त्यानुसार गोंदिया आगारातून मध्य प्रदेश येथे जाणाऱ्या २५ फेऱ्या शनिवारपासून (दि. २०) बंद रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या ३१ मार्चपर्यंत फेऱ्यांवर बंदी घालण्यात आली असून, याबाबत शुक्रवारी (दि. १९) गोंदिया आगाराला तसे आदेश मिळाले आहेत. राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. दररोज हजारोंच्या संख्येत बाधितांची संख्या वाढत चालली असून, कित्येक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची पाळी आली आहे. अशा स्थितीत प्रवाशांची ये-जा सुरू राहिल्यास त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच बाब हेरून मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातून तेथे जात असलेल्या बस फेऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. २० मार्चपासून येत्या ३१ मार्चपर्यंत या फेऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच, मध्य प्रदेशात जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच बसेस आता मध्य प्रदेशात जाणार नाहीत व अशात महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांचा बसेसद्वारे असलेला संपर्क तुटणार आहे. या आदेशानुसार, गोंदिया आगारालाही शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी बसफेऱ्या बंद करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे, मध्य प्रदेश राज्याची सीमा जेमतेम २० किलोमीटर असून तेथील नागरिक मोठ्या प्रमाणात दररोज गोंदियात येतात. यात बसने त्यांचा प्रवास जास्तीतजास्त प्रमाणात होतो. मात्र, आता बसफेऱ्या बंद पडल्याने त्यांची गैरसोय होणार आहे. शिवाय, गोंदिया आगाराच्या उत्पन्नावरही याचा परिणाम होणार यात शंका नाही. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही राज्यांच्या सरकारने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे. गोंदिया आगारातून मध्य प्रदेश राज्यात एकूण २५ फेऱ्या जात होत्या. यामध्ये १ लांजी, १९ बालाघाट तर ५ रजेगावच्या फेऱ्या आहेत. मात्र, आता या आदेशानंतर या २५ फेऱ्या पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. 

डोंगरगड फेरीही बंद मध्य प्रदेश राज्याला बस फेऱ्या जोडत असतानाच छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथेही गोंदिया आगाराची १ फेरी होती. मात्र, सध्या ती फेरीही बंद करण्यात आली आहे. याशिवाय मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडासाठीही गोंदिया आगारातून बस जात होती. ती फेरीही २१ फेब्रुवारीपासून बंद असून, सध्या ती फेरी सावनेरपर्यंतच जात आहे. तिरोडा आगाराच्या ४ फेऱ्या बंद मध्य प्रदेश राज्यात गोंदिया आगाराच्या फेऱ्या जात असतानाच जिल्ह्यातीलच तिरोडा आगारातून ४ फेऱ्या बालाघाटला जात होत्या. मात्र, आता त्यांच्या या ४ फेऱ्याही बंद करण्यात आल्या आहेत. एकंदर दोन्ही आगारांकडून दोन्ही राज्यांतील प्रवाशांसाठी असलेली ही सुविधा आता खंडित झाली आहे.

 

टॅग्स :state transportएसटी