शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

२५ टक्के शेतकऱ्यांचीही कर्जमाफी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 21:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकरी, मराठा, धनगर तर कधी दूध व भाजीपाला उत्पादकांचे आंदोलन सुरू आहे. त्यात आता शासकी कर्मचाऱ्यांनी तीन दिवस काम बंद करून शासनाला ठप्प केले आहे. बरोजगारीने वाढत असून जीएसटीने आर्थिक मंदी सकंट ओढावले आहे. एवढ्यावरही शेतकरी हिताच्या गोष्टी करणाऱ्या भाजपराजमध्ये १० हजार रूपयांची अतिरीक्त कर्जाची मदत मिळालेली ...

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : जिल्हा कॉँग्रेस कमिटीची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकरी, मराठा, धनगर तर कधी दूध व भाजीपाला उत्पादकांचे आंदोलन सुरू आहे. त्यात आता शासकी कर्मचाऱ्यांनी तीन दिवस काम बंद करून शासनाला ठप्प केले आहे. बरोजगारीने वाढत असून जीएसटीने आर्थिक मंदी सकंट ओढावले आहे. एवढ्यावरही शेतकरी हिताच्या गोष्टी करणाऱ्या भाजपराजमध्ये १० हजार रूपयांची अतिरीक्त कर्जाची मदत मिळालेली नाही. हेच काय, थकीत शेतकºयांमधील २५ टक्के शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजीत विशेष सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांनी या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजप सरकार चतुराई व कुटनितीने काम करीत आहे. जिरायती शेतकऱ्यांना हेक्टरी ६८०० रूपये तर बागायती शेतकऱ्यांना हेक्टरी १३५०० रूपयांची मदत देण्याची घोषणा केली. अशातच गोंदियातील काही उत्साही नेत्यांनी मोठमोठे होर्डींगही लावले. मात्र जिल्ह्यातील एकही शेतकऱ्याला १३५०० रूपयांची मदत मिळाली नसल्याचे सांगीतले. त्यामुळे आता राहूल गांधी यांचे हात मजबूत करण्यासाठी ‘शक्ती अ‍ॅप’शी जुळा असेही सांगीतले.सभेला माजी मंत्री भरत बहेकार, महासचिव राजेश नंदागवळी, अमर वºहाडे, सहेसराम कोरोटे यांनी, पक्षाने केलेली लोकहिताची कामे घरोघरी पोहचवून कॉंग्रेसच्या ‘शक्ती अ‍ॅप’ सोबत जिल्ह्यातील प्रत्येकी कॉँग्रेसीला जोडावे असे मत व्यक्त केले. सेवादल अध्यक्ष पन्नालाल सहारे, लोकसभा युवक कॉँग्रेस अध्यक्ष प्रफुल अग्रवाल, प्रदेश सचिव डॉ. योगेंद्र भगत, विनोद जैन, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, सभापती लता दोनोडे, सभापती रमेश अंबुले, माजी आमदार रामरतन राऊत, उषा मेंढे, झामसिंग बघेले, राधेलाल पटले, अ‍ॅड,के.आर.शेंडे, पी.जी.कटरे, राकेश ठाकूर, माधुरी हरिणखेडे, पौर्णिमा शहारे, सीमा कटरे, विमल नागपूरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, गिरीष पालीवाल, विजय टेकाम, दीपक पवार, माधुरी कुंभरे, ज्योती वालदे, सरिता कापगते, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.