लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर पालिकेने येत्या २०२०-२१ आर्थिक वर्षाकरिता २४८ कोटी ८१ लाख २० हजार ४९८ रूपयांचा प्रारूप अर्थसंकल्प मंगळवारी (दि.२५) आयोजीत विशेष सभेत सादर करण्यात आला. या प्रारूप अर्थसंकल्पात शहर सौंदर्यीकरण सोबतच नागरी सुविधा व आरोग्य विषयक सुविधांवर भर देण्यात आल्याचे दिसले. विशेष म्हणजे, या सभेत शहरात काही नवीन प्रयोग करण्यात येणार असल्याचे दिसले.आर्थिक वर्ष सन २०२०-२१ च्या प्रारूप अर्थसंकल्पासाठी पालिकेत मंगळवारी (दि.२६) विशेष सभा घेण्यात आली. यात मागील वर्षातील अर्थसंकल्प मांडून त्यानंतर वर्ष २०२०-२१ करिता २४८ कोटी ८१ लाख २० हजार ४९८ रूपयांचा प्रारूप अर्थसंकल्प सादर करण्यात आला. विशेष म्हणजे, या प्रारूप अर्थसंकल्पात शहरातील स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा, वीज पुरवठा व दवाखान्यांवर विशेष लक्ष देण्यात आले असून त्यासाठी चांगलीच तरतूद करण्यात आली आहे.अशी केली आहे ठळक तरतूदपालिकेच्या या प्रारूप अर्थसंकल्पात नगर परिषदेने विविध विभागांसाठी तरतूद केली असून त्यात स्मशान घाटकरिता ४० लाख रूपये, मोठे नाले बांधकामाकरिता २५ लाख रूपये, शाळा इमारत बांधकाम व दुरूस्ती करिता एक कोटी पाच लाख रूपये, विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन व पुरस्कारासाठी २० लाख रू पये, तलाव-बोडी सौंदर्यीकरण एक कोटी २५ लाख लाख रूपये, नगर परिषद मालकीच्या जागांना आवारभिंत बांधकाम एक कोटी ५० लाख रूपये, शहरातील मुख्य चौकांचे विद्युतीकरण व सौदर्यीकरणासाठी ४० लाख रूपये, जास्त रहदारीच्या ठिकाणी सुलभ सुविधागृह बांधकाम एक कोटी रूपये, नगर परिषद इमारतीत आवश्यक सुविधा उपलब्ध करणे ३० लाख रूपये, सुभाष गार्डन व निर्माणाधीन उद्यानांसाठी ५० लाख रूपये, प्रत्येक प्रभागात एक व्यायामशाळा उभारण्यासाठी एक कोटी रूपये, पालिकेच्या रिकाम्या जागांवर प्रौढ व्यक्तींकरिता मनोरंजन केंद्र उभारण्यासाठी १२ लाख रूपये, नगर परिषद योजनांच्या प्रचारासाठी १० लाख रूपये, शहरातील व्यस्त ठिकाणी प्रवासी निवारा, पार्कींग आणि उद्यान उभारण्यासाठी २० लाख रूपये, नवीन प्रशासकीय ईमारत बांधकामासाठी १४ कोटी रूपये, नवीन बाजार बांधकाम (गाळे) ५० कोटी रूपये, शाळेत इ-लर्निंग व संगणक खरेदीसाठी एक कोटी २५ लाख रूपये, वृक्ष लागवडीकरीता राखीव निधीसाठी दोन कोटी ५० लाख रूपये, धोटे सुतिका गृहसाठी सात कोटी रूपये, फायर स्टेशन बांधकामासाठी तीन कोटी रूपये, वाहन व इतर साहित्य खरेदी व बांधकामासाठी चार कोटी रूपये, नवीन वाहन दुरूस्ती व देखरेखसाठी २० लाख रूपये, नवीन दवाखाने व हेल्थ केअर सेंटरसाठी एक कोटी रूपये तर मोकाट जनावरांच्या व्यवस्थेसाठी १६ लाख रूपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती लेखाधिकारी अभिजीत फोपाटे व सह लेखाधिकारी महेश खारोडे यांनी दिली.
पालिकेचा २४९ कोटींचा प्रारूप अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST
आर्थिक वर्ष सन २०२०-२१ च्या प्रारूप अर्थसंकल्पासाठी पालिकेत मंगळवारी (दि.२६) विशेष सभा घेण्यात आली. यात मागील वर्षातील अर्थसंकल्प मांडून त्यानंतर वर्ष २०२०-२१ करिता २४८ कोटी ८१ लाख २० हजार ४९८ रूपयांचा प्रारूप अर्थसंकल्प सादर करण्यात आला. विशेष म्हणजे, या प्रारूप अर्थसंकल्पात शहरातील स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा, वीज पुरवठा व दवाखान्यांवर विशेष लक्ष देण्यात आले असून त्यासाठी चांगलीच तरतूद करण्यात आली आहे.
पालिकेचा २४९ कोटींचा प्रारूप अर्थसंकल्प
ठळक मुद्देचौकांचे विद्युतीकरण व सौंदर्यीकरण : नवीन दवाखाने व पब्लिक हेल्थ केअर सेंटरवर भर