शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन परतीच्या नोटीसला करदात्या २४७५ शेतकऱ्यांचा ठेंगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 05:00 IST

पंतप्रधान किसान पेन्शन योजनेतंर्गत एकूण ३१७१ करदात्या शेतकऱ्यांकडून ३ कोटी ६७ लाख रुपये प्रशासनाला वसूल करायचे होते. आठही तालुक्यातील तहसीलदारांच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांना नोटीस बजाविण्यात आली. त्यानंतर ६९६ शेतकऱ्यांनी १ कोटी ३९ लाख २० हजार रुपयांचा भरणा शासनाकडे केला आहे. 

ठळक मुद्देपीएम किसान पेन्शन योजना : ३१७१ शेतकरी ठरले होते अपात्र, प्रशासनाने बजावली होती नोटीस

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया  : पंतप्रधान किसान पेन्शन योजनेतंर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये मानधन दिले जात आहे. मात्र काही करदाते आणि शासकीय नोकरीवर असलेले शेतकरी सुद्धा या योजनेचा लाभ घेत होते. ही बाब केंद्र शासनाच्या लक्षात आल्यानंतर करदात्या शेतकऱ्यांकडून ही रक्कम परत मागविण्यासाठी शेतकऱ्यांना नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानंतर यापैकी ६९६ शेतकऱ्यांनी १ कोटी ३९ लाख २० हजार रुपये मानधनाची रक्कम शासनाकडे जमा केली आहे. नोटीस बजाविल्यानंतर मानधनाची रक्कम परत करण्यासाठी करदाते शेतकरी पुढे येत आहे. या प्रक्रियेला गती सुद्धा आली होती. मात्र डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या प्रक्रियेत अडचण निर्माण झाली होती. पंतप्रधान किसान पेन्शन योजनेतंर्गत एकूण ३१७१ करदात्या शेतकऱ्यांकडून ३ कोटी ६७ लाख रुपये प्रशासनाला वसूल करायचे होते. आठही तालुक्यातील तहसीलदारांच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांना नोटीस बजाविण्यात आली. त्यानंतर ६९६ शेतकऱ्यांनी १ कोटी ३९ लाख २० हजार रुपयांचा भरणा शासनाकडे केला आहे. तर २४७५ शेतकऱ्यांकडून अद्यापही पैसे भरण्यात आले नाही. कोरोनाचा संसर्ग तसेच काही तांत्रिक अडचणीमुळे यात विलंब होत असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.  

आतापर्यंत १ कोटी ३९ लाख रुपये वसूल

पीएम किसान पेन्शन योजनेतंर्गत एकूण ३१७१ शेतकरी अपात्र ठरले होते. यांना जिल्हा प्रशासनाने मानधनाचे पैसे परत करण्यासाठी नोटीस बजावली होती.नोटीस बजाविल्यानंतर ३१७१ शेतकऱ्यांपैकी ६९६ शेतकऱ्यांनी १ कोटी ३९ लाख २० हजार रुपये मानधनाची रक्कम प्रशासनाकडे जमा केली आहे. कोरोनाचा संसर्ग आणि काही तांत्रिक अडचणीमुळे मानधनाचे पैसे  परत करण्यात अडचणी येत असल्याने अद्यापही २४७५ शेतकऱ्यांकडून २ कोटी ३० लाख रुपयांची रक्कम परत होणे बाकी आहे. पीएम किसान पेन्शन योजनेतंर्गत अपात्र ठरलेल्यांमध्ये सर्वाधिक करदाते शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

दोन हजारांवर शेतकऱ्यांना अद्यापही लाभ नाही पीएम किसान पेन्शन योजनेतंर्गत जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. मात्र यापैकी दोन हजारांवर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मानधनाचा एकही हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे हे शेतकरी अद्यापही शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता केव्हा जमा होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.  

पीएम किसान पेन्शन योजनेतंर्गत अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून मानधनाची रक्कम वसूल करण्यासाठी नोटीस बजाविण्यात आली. यानंतर ६९६ शेतकऱ्यांनी पैसे परत केले. तर उर्वरित शेतकऱ्यांकडून सुद्धा मानधनाची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. कोरोनामुळे यात काही अडचण आली होती.- दीपक कुमार मीना, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी