शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

आठ महिन्यांत २.४५ कोटींचे उत्पन्न

By admin | Updated: December 25, 2016 02:04 IST

बांबू, साग व सागेतर लाकडांच्या विक्रीद्वारे गोंदिया वन विभागाला दरवर्षी कोट्यवधी रूपयांचे उत्पन्न मिळते.

१७.८१ लाख बांबू उत्पादन : ९६ हजार बांबूंची विक्री बाकी, १.१३ लाख नग वाटप देवानंद शहारे  गोंदिया बांबू, साग व सागेतर लाकडांच्या विक्रीद्वारे गोंदिया वन विभागाला दरवर्षी कोट्यवधी रूपयांचे उत्पन्न मिळते. गोंदिया वन विभागात सन २०१५-१६ मध्ये १७ लाख ८१ हजार ००५ बांबूचे उत्पादन झाले. शिवाय त्यापूर्वीचे काही बांबू उर्वरित होते. या बांबूंच्या विक्रीतून एप्रिल ते नोव्हेंबर २०१६ पर्यंत आठ महिन्यांच्या कालावधीत गोंदिया वन विभागाला तब्बल दोन कोटी ४५ लाख ९९ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. यात गोंदिया वन विभागाने नऊ लाख ९३ हजार ३९० बांबू नगांची विक्री जाहीर लिलावाच्या माध्यमातून केली. त्याद्वारे वन विभागाला दोन कोटी ३२ लाख तीन हजार ५०० रूपयांचे उत्पन्न मिळाले. तर २० बांबूंचा एक बंडल याप्रमाणे एकूण १४ हजार ४८२ बंडल्सची विक्री करण्यात आली. त्याद्वारे १३ लाख ९५ हजार ५०० रूपयांचे उत्पन्न मिळाले. तर ९६ हजार बांबूंची विक्री बाकीच आहे. या उर्वरित बांबूंची विक्री २९ डिसेंबर २०१६ रोजी सालेकसा येथे जाहीर लिलावाद्वारे करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. याशिवाय ४४ हजार ५०० बांबूंचा पुरवठा गोंदिया वन विभागातील इतर डेपोंमध्ये करण्यात आला. तर एक लाख ६३ हजार २७५ बांबूंचा पुरवठा बुरड-कास्तकारांना करण्यात आल्याचे वन विभागाच्या आकडेवारीवरून समजते. तसेच उत्पादित बांबू गडचिरोली, गडेगाव आदी ठिकाणी बुरवड व निस्तारासाठी पुरवठा केला जातो. सन २०१६-१७ च्या अंदाजपत्रकानुसार, वन विभागाने बांबू उत्पादनासाठी ३२२३.५२१ हेक्टरचे नियोजन केले. यात १६ लाख ७० हजार ४६४ बांबू व५९ हजार ८३२ बांबू बंडल्स उत्पादित होण्याचा अंदाज आहे. कटाई काम सुरू होणे बाकी आहे. मात्र कटाई, पासिंग, वाहतूक व इतर खर्च आदी बाबी घेवून बांबू निष्कासनासाठी एक कोटी ८३ लाख ११ हजार ६३० रूपयांचा खर्च येणार असल्याचे अंदाजपत्रकात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी ३१ मार्च २०१६ पर्यंत दोन हजार ६४२ हेक्टर क्षेत्रात लांब बांबू १६ लाख ३९ हजार ७६८ व बांबू बंडल्स ३३ हजार ०५५ एवढे झाले होते. आदिवासी कास्तकारांचाच माल किंवा वनोपज वन विभागाच्या डेपोमध्ये जमा केला जातो. गैर आदिवासींचा माल डेपोमध्ये जमा केला जात नाही. कटाई, पासिंग, वाहतूक आदी प्रक्रियेतून बांबू निष्कासन झाल्यानंतर कास्तकाराच्या मागणीनुसार त्याला पैसा दिला जातो. यात २० टक्के अग्रीम, वाहतुकीप्रसंगी ३० टक्के व विक्रीनंतर संपूर्ण रक्कम दिली जाते. कास्तकाराला पूर्ण पैसा मिळण्यासाठी तीन महिन्यांचा (९० दिवस) कालावधी लागतो, असे सूत्रांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे वन विभागाला झालेल्या नफ्यातून ७ टक्के रक्कम जिल्हा परिषदेला विविध विकासकामांसाठी दिले जाते. त्या रक्कमेतून जिल्हा परिषद गरजेनुसार विकासकामे करते व त्याचे युटीलायझेन प्रमाणपत्र वन विभागाला देते. त्यानुसार मागच्या वर्षी जिल्हा परिषदेला २७ लाखांपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली होती. साग-सागेतर लाकडांतून ४४.४२ लाखांचे उत्पन्न साग, सागेतर, फाटे व जलाऊ लाकडांच्या विक्रीतून वन विभागाला एप्रिल ते नोव्हेंबर २०१६ या आठ महिन्यांच्या कालावधीत ४४ लाख ४२ हजार ७४६ रूपयांचे उत्पन्न मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यात ३७१.२१२ घनमीटर सागवन लाकडांच्या विक्रीतून २३ लाख ६६ हजार ११० रूपये, ११०.२३२ घनमीटर सागेतर लाकडांच्या विक्रीतून १० लाख ३६ हजार ७६० रूपये, १२३.९५ घनमीटर सागाच्या जलाऊ लाकडांद्वारे पाच लाख ४३ हजार ७५० रूपये, एक हजार ७६८ सागाच्या फाट्यांच्या विक्रीतून दोन लाख २८ हजार ५६५ रूपये, ७०६ सागेतर फाट्यांद्वारे २९ हजार ६०१ रूपये, २५.२६९ घनमीटर ईतर जलाऊ लाकडांच्या विक्रीतून ९४ हजार ५५० रूपये व ६९.८३ अन्य जलाऊ लाकडांच्या विक्रीतून वन विभागाला एक लाख ४३ हजार ४१० रूपयांचे उत्पन्न मिळाले.