शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

२२ चिमुकल्यांना केले पालकांच्या स्वाधीन

By admin | Updated: July 20, 2015 01:17 IST

आॅपरेशन मुस्कान अंतर्गत पोलिसांनी या पंधरवड्यात आणखी २२ चिमुकल्यांना हुकडून काढले असून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात यश मिळविले आहे.

आॅपरेशन मुस्कान : अद्याप ३५ बालकांचा शोध सुरूचगोंदिया : आॅपरेशन मुस्कान अंतर्गत पोलिसांनी या पंधरवड्यात आणखी २२ चिमुकल्यांना हुकडून काढले असून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात यश मिळविले आहे. १ ते १५ जुलै दरम्यानच्या कालावधीत करण्यात आलेली ही कारवाई असून अद्याप बेपत्ता असलेल्या ३५ चिमुकल्यांचा शोध पोलीस घेत आहेत. लहान मुला-मुलींचे अपहरण करून त्यांच्याकडून भीक मागविणे तसेच वाममार्गाला लावण्याचे प्रकार काहींकडून केले जातात. तर मुलींना देह व्यवसायाच्या कामात लावण्यासाठी त्यांचे अपहरण केले जाते. १८ वर्षाखाली मुला-मुलींच्या बेपत्ता व अपहरणाच्या या संख्येला लक्षात घेत राज्यशासनाने या बालकांना शोधून त्यांच्या आईवडीलांच्या हवाली करण्यासाठी आॅपरेशन मुस्कान ही मोहीम सुरू केली आहे. १ ते ३० जुलै या कालावधीत ही मोहीम राबविली जाणार असून यासाठी जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी व दोन कर्मचारी यासाठी लावले आहेत. हरविलेल्या किंवा अपहरण झालेल्या मुलांमधील काही मुले पालकांकडे परत आली असल्यास त्यांची खात्री करून त्याबाबतची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात नेमलेले विशेष पथक हे दररोज अशा मुलांचा शोध घेऊन नियंत्रण कक्षात माहिती देत आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांशी समन्वय साधून हरविलेल्या बालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानके, रूग्णालय, उद्याने, चौक, रेल्वेस्थानक व सार्वजनिक ठिकाणी फिरस्ते किंवा भीक मागणाऱ्या मुलांशी संपर्क अभियान जोमात सुरू आहे. या कामात पोलीस विभाग स्वयंसेवी संस्थाची मदत घेत आहे. तर हरविलेली किंवा घरातून निघून गेलेली मुले-मुली सापडल्यानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन करताना छायाचित्र काढून प्रसारीत केली जाणार आहेत.हरविलेल्या तसेच अपहरण करण्यात आलेल्या चिमुकल्यांबाबत मिळालेल्या आकडेवारीनुसार सन २०१० ते ३० जून २०१५ या काळात जिल्ह्यातील २४८ मुले तर ५०७ मुली बेपत्ता झाल्या होत्या. यात मागील पंधरवड्यात पोलिसांनी २२ चिमुकले शोधून काढले आहेत. अशाप्रकारे २३८ मुले व ४८२ मुली पोलिसांना मिळाल्या असून अद्याप १० मुले व २५ मुली बेपत्ता आहेत.पोलीसांनी आॅपरेशन मुस्कानला यशस्वी करण्याचा चंग बांधल्यामुळे या पंधरवाड्यात बेपत्ता मुलामुलींचा शोध घेण्यात त्यांना यश लाभले आहे. पोलिसांनी ठरविले तर कारवाईचे कोणतेही काम अशक्य नाही. परंतु पोलिस काही ठिकाणी दिरंगाई करीत असल्यामुळे अनेक प्रकरणे उघडकीस येत नसल्याचे प्रकार ही बघावयास मिळतात. (तालुका प्रतिनिधी)