शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संपात जिल्ह्यातील २०० डॉक्टरांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:08 IST

केंद्र सरकारतर्फे इंडियन मेडीकल कौन्सीलमध्ये बदल करुन नॅशनल मेडीकल कमिशन हा नवीन कायदा लागू केला जात आहे. मात्र नॅशनल मेडीकल कमिशन हे एमबीबीएस डॉक्टरांसाठी अन्यायकारक आहे.

ठळक मुद्देनॅशनल मेडीकल कमिशनला विरोध : रुग्ण सेवेवर परिणाम, खासदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारतर्फे इंडियन मेडीकल कौन्सीलमध्ये बदल करुन नॅशनल मेडीकल कमिशन हा नवीन कायदा लागू केला जात आहे. मात्र नॅशनल मेडीकल कमिशन हे एमबीबीएस डॉक्टरांसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे याचा विरोध करण्यासाठी देशभरातील एमबीबीएस डॉक्टरांनी शनिवारी (दि.२८) देशव्यापी संपाचा इशारा दिला होता. यात जिल्ह्यातील इडियन मेडीकल असोसिएशनचे(आयएमए) दोनशे डॉक्टर सहभागी झाले होते. त्यामुळे रूग्णसेवेवर परिणाम झाला होता.केंद्र सरकारतर्फे आणल्या जाणाऱ्या नॅशनल मेडीकल कमिशनला आयएमएने सुरूवातीपासूनच विरोध केला आहे. नवीन कायद्यामुळे भारतीय वैद्यक परिषदेचे प्रातिनिधीक अस्तित्व संपुष्टात येणार आहे. तर यामुळे शासननियुक्त प्रतिनिधीची वर्णी लागणार आहे. यामुळे वैद्यकीय महाविद्यालय व वैद्यकीय व्यवसायावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. नॅशनल मेडीकल कमिशन विधेयक लोकसभेत मंजूर केले हे गरीबांसाठी हानीकारक तर सर्वसामान्यासाठी असुविधाजनक आहे. लोकशाही तत्वांना बाधक आहे. यामुळे वैद्यकीय सेवा व वैद्यकीय शिक्षण महागणार आहे. या विधेकामुळे केवळ श्रीमंत लोकच सेवा प्राप्त करु शकतील. यामुळेच आयएमएने या विधेकाला विरोध केला आहे. याच विरोधाचा भाग म्हणून शनिवारी राज्याभरातील खासगी एमबीबीएस डॉक्टारांनी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीत संप केला. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसेवेवर परिणाम झाला होता.या संपात जिल्ह्यातील आयएमएशी निगडीत दोनशे डॉक्टर सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील दीडशे खासगी रुग्णालय शनिवारी सायंकाळी ६ वाजतापर्यंत बंद होते.दरम्यान रुग्णांची गैरसोय होवू नये, यासाठी आपातकालीन सेवा सुरू ठेवण्यात आली होती. आयएमएच्या शिष्टमंडळातर्फे खासदार मधुकर कुकडे, आ.गोपालदास अग्रवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच नवीन विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात आयएमच्या अध्यक्ष डॉ. निर्मला जयपुरीया, डॉ. सचिव संजय भगत, डॉ. नरेश मोहरकर, डॉ.राजेंद्र जैन, डॉ.के.पी.जयपुरीया, डॉ.पियूष जयस्वाल यांचा समावेश होता.

टॅग्स :doctorडॉक्टरStrikeसंप