शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

२० टक्के दुग्ध उत्पादनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:12 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वत्र शेतकऱ्यांची विदारक स्थिती आहे. पारंपरिक शेतीमुळे दिवसेंदिवस शेती म्हणजे घाट्याचा सौदा होत चालली आहे. शेतकºयांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देकामधेनू दत्तक ग्राम : जनावरांच्या देखरेखीसाठी दीड लाख रूपये

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वत्र शेतकऱ्यांची विदारक स्थिती आहे. पारंपरिक शेतीमुळे दिवसेंदिवस शेती म्हणजे घाट्याचा सौदा होत चालली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय करण्याची गरज आहे. सन २०११-१२ पासून गोंदिया जिल्ह्यातील ३०६ गावांना कामधेनू ग्राम म्हणून दत्तक योजनेतंर्गत दत्तक घेवून २० टक्के दुग्ध उत्पादनात वाढ झाल्याचे चित्र आहे.गावात दूध उत्पादनात वाढ करण्यात यावी. पशुपालनाला तांत्रीक जोड देऊन लसीकरणापासून जनावरे संवर्धनापर्यंतची जबाबदारी सांभाळण्याची किमया पशुसंवर्धन विभागाकडून कामधेनू दत्तक गावात करण्यात येते. गोंदिया जिल्ह्यात कामधेनू दत्तक ग्राम योजनेत सन २०१८-१९ या वर्षात ३० गावांचा समावेश आहे. त्या गावात पूर्वीच्या तुलनेत २० टक्के दूध उत्पादन वाढले आहे.शेतकऱ्यांच्या पारंपारीक शेतीला पूरक जोड देणारा दुग्ध व्यवसायात वाढ झाली आहे. सन २०११-१२ पासून कामधेनू दत्तक ग्राम योजना राबविण्यात आली. यावर्षी ३१ गावे दत्तक घेण्यात आली होती. सन २०१२-१३ या वर्षी ६५ गावे, सन २०१३-१४ या वर्षी ६७ गावे, सन २०१४-१५ या वर्षी ५३ गावे, सन २०१५-१६ या वर्षी ३२ गावे, सन २०१६-१७ या वर्षी ३२ गावे, सन २०१७-१८ या वर्षी २६ गावे अशा ३०६ गावांना कामधेनू योजनेत दत्तक घेण्यात आले. त्या गावातील पशुपालकांना योग्य मार्गदर्शन केल्यामुळे त्या गावातील दूध उत्पादनात २० टक्याने वाढ झाल्याचे दिलासा दायक चित्र आहे.जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे सन २०१८-१९ या वर्षात कामधेनू दत्तक ग्राम म्हणून ३० गावांची निवड केली. ३०० पैदास योग्य पशू असणाऱ्या या गावांची पशू गणना करून त्या गावांची कामधेनू दत्तक ग्राम म्हणून निवड करण्यात आली. एप्रिल महिन्यापासून १२ टप्यात पशू गणना करून सर्व निकष पूर्ण करणाऱ्या गावाला कामधेनू दत्तक ग्राम म्हणून पशूसंवर्धन विभागाने दत्तक घेतले.ज्या गावाला दत्तक घेतले त्या गावातील सर्व जनावरांचे लसीकरण, दुग्ध उत्पादन किती आहे, दूध उत्पादन वाढविण्यासाठी काय करता येईल. जनावरांची औषधे, खनिजद्रव्ये, जंतनाशक औषधी, गोचीड, शेतकऱ्यांची सहल नेणे, नाविन्यपूर्ण उपक्रम, संकरीत वासरांचा मेळावा घेऊन त्यांना बक्षीस देणे, वैरण विकासासाठी प्रयत्न करणे, जनावरांच्या विस्तारासाठी कार्यक्रम घेणे, गोठा स्वच्छ करणे, चाºयाचे व खताचे व्यवस्थापन करण्यात येते.या दत्तक गावाला वर्षासाठी एक लाख ५२ हजार रूपये त्या गावाला जनवारांच्या संवर्धनासाठी देण्यात येतात. गावातील सर्वाधीक पशु मालकाला पशू मालक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली जाते.अधिकाऱ्यांचा रात्री मुक्कामकामधेनू गावातील शेतकºयांना व पशुमालकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक व त्यांचे इतर अधिकारी त्या गावात एक दिवस मुक्काम करतात. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ कशी करता येईल. यावर मार्गदर्शन करतात. कामधेनू गावात पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे डॉ.वासनिक यांनी सांगितले.यंदाचे कामधेनू दत्तक गावजिल्हा पशूसंर्वधन विभागाने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात ३० गावांना दत्तक ग्राम म्हणून घेतले होते. त्यात टेमणी, शिरपूर, कोरणी, डांगुर्ली, अदासी, नवेगाव, कवळी, करंजी, मक्कीटोला, अंजोरा, हलबीटोला, पिपरीया, पोवारीटोला, बंजारी, मुरदोली, इस्तारी, चोरखमारा, ठाणेगाव, मेहंदीपूर, मनोरा, पूरगाव, तेलनखेडी, कुऱ्हाडी, तेढा, कोसबी-कोल्हारगाव, तिडका, पांढरी-हलबीटोला, नवेगावबांध, महागाव व बोंडगावदेवी या गावांचा समावेश आहे.

टॅग्स :milkदूध