शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

१९९ शेतकऱ्यांचे चुकारे अडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 21:49 IST

फक्त धानाची शेती करून उपजिविका चालविणाऱ्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्याच्या बोनसच्या आश्वासनाला बळी पडून आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर आपले धान विकले. परंतु त्या १९९ शेतकऱ्यांचे एक कोटी रूपयांचे चुकारे करण्यात आले नाही.

ठळक मुद्देएक कोटींचे चुकारे थकले : सातगाव-मक्काटोला केंद्रावरील शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : फक्त धानाची शेती करून उपजिविका चालविणाऱ्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्याच्या बोनसच्या आश्वासनाला बळी पडून आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर आपले धान विकले. परंतु त्या १९९ शेतकऱ्यांचे एक कोटी रूपयांचे चुकारे करण्यात आले नाही. मागील तीन महिन्यांपासून आपल्या हक्काच्या पैशांसाठी शेतकऱ्यांची पायपीट सुरू आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकºयांना मागील वर्षाचे पैसे मिळाले नसल्याची ओरड आहे.मागील वर्षी सालेकसा तालुक्यातील ग्राम मक्काटोला व सातगाव येथील दोन धान खरेदी केंद्रांवर परिसरातील शेतकऱ्यांनी खरिपाचे धान विकले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या बोनसमुळे त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावरच आपले धान विकले. ३१ मार्चपर्यंत आॅनलाईन खरेदी होती. परंतु धानखरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धान त्वरीत मोजणी होईल यासाठी विशेष यंत्रणा नसल्यामुळे ३१ मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या धानाची मोजणी करण्यात आली नाही. परंतु ३१ मार्च रोजी रात्री १२ वाजता आॅनलाईन धान खरेदीची वेबसाईट बंद झाल्याने केंद्रावर आलेले धान मोजता आले नाही.शेतकऱ्यांचे धान परतही पाठविता येत नव्हते. यामुळे अडचणीत सापडलेल्या धान खरेदी केंद्रावरील लोकांनी त्या धानाचे पंचनामे करून आॅफ लाईन धानाची खरेदी तब्बल तीन दिवस करण्यात आली.परंतु आॅफ लाईन खरेदी करण्यात आलेल्या धानाचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात आले नाही. आॅफ लाईन खरेदी करण्यात आलेल्या धानाचे आॅनलाईन नोंद केल्यानंतरच त्याचे पेमेंट शेतकऱ्यांना होऊ शकेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.मक्काटोला केंद्रावरील ३१ शेतकऱ्यांचे ८९७.६० क्विंटल धानाचे १५ लाख ७० हजार ८०० रूपयांचे चुकारे शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाही.तर सातगाव धान खरेदी केंद्रावरील ८२ शेतकऱ्यांचे २२३३.६४ क्विंटल धान धारेदी करण्यात आले. त्याचे ३९ लाख नऊ हजार ८७० रूपये धानाचे चुकारे थकले आहेत.तर काही ठिकाणचे तुरळक अशा एकूण १९९ शेतकऱ्यांचे आॅफलाईन खरेदी केलेल्या पाच हजार ७०९.४३ क्विंटल धानाचे ९९ लाख ९० हजार ७५० रूपयांचे चुकारे अडले आहेत.साईट उघडण्यासाठी पाठपुरावामार्च अखेर विक्री केलेल्या धानाची आॅफलाईन खरेदी झाली. ती खरेदी आॅनलाईन होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तीन महिन्यांपासून धानाचे चुकारे मिळाले नाहीत. या १९९ शेतकऱ्यांच्या समस्येला घेऊन आदिवासी विकास महामंडळाने राज्य व केंद्र शासनाकडे मंजूरीसाठी प्रकरण पाठविले आहेत. आॅनलाईन खरेदी करण्यासाठी साईट उघडणे आवश्यक आहे. यासाठी अधिकाºयांचा पाठपुरावा सुरू आहे.मागील वर्षी तीन वेळा उघडली होती साईट३१ मार्च पर्यंतच धान खरेदी करण्यासाठी आॅनलाईन साईट सुरू होती. मागील वर्षी देखील हीच प्रक्रीया होती. परंतु मागील वर्षी तीन वेळा ही साईट सुरू करण्यात आली होती. परंतु यंदा एकदाही साईट सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकºयांना धानाचे चुकारे अद्यापही होऊ शकले नाही.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड