शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

१९० ब्रास अवैध मुरूम उत्खनन

By admin | Updated: August 18, 2016 00:15 IST

येथील शासकीय जागेतील गट क्रमांक ६८ आराजी मधील मुरूम अवैधपणे उत्खनन करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

बाराभाटी : येथील शासकीय जागेतील गट क्रमांक ६८ आराजी मधील मुरूम अवैधपणे उत्खनन करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. ५० ब्रास मुरुमाऐवजी २४० ब्रास उत्खनन करण्यात आले. त्यामुळे विनारॉयल्टी १९० ब्रास मुरूम उत्खनन केल्याचे दिसून आले. १६ आॅगस्ट रोजी सकाळी गट क्रमांक ६८ या जागेतील मुरूम ट्रॅक्टरमध्ये भरला जात होता. पोलिसांनी दोन ट्रॅक्टरमध्ये मुरूम भरत असताना प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्यांना रोखले. या गट क्रमांकातून ४ ते १६ आॅगस्ट २०१६ पर्यंत खनिज परवाना होता. मात्र मौका ठिकाणी चौकशी करतांना २४० ब्रास मुरूम उत्खनन दिसले. यावेळी सरपंच, उपसरपंच, सचिव तसेच सदस्य उपस्थित होते. उत्खनन करताना रॉयल्टी परवाना नव्हता. सदर उत्खनन मुरूमापैकी काही मुरूम गावातील रस्त्यावर, जि.प.शाळेत, अंगणवाडी या ठिकाणी टाकल्याचे दिसते. तर काही मुरूमाच्या ट्रिप बाहेरगावाला विकल्याचे गावकरी सांगतात. मुरूम भरताना दोन ट्रॅक्टर हजर होते. त्यांच्यावर सुध्दा कारवाई होणार व तीन पट दंड वसूल होणार असे उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी सांगितले. या प्रकरणाचा पंचनामा डब्ल्यू.एफ.कोहाडकर, मंडळ अधिकारी व तलाठी लालेश्वर टेंभरे यांनी केला. यावेळी सरपंच अनिता खोब्रागडे, उपसरपंच श्रावण मेंढे, ग्रामसेवक (सचिव) परमेश्वर नेवारे, शिलेन नशीने, ईश्वर बेलखोडे, वाल्मीक खोब्रागडे, विलास बन्सोड आदी उपस्थित होते.(वार्ताहर)