शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या तिसऱ्या फेरीत १८३ विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:06 IST

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायमविना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे.

ठळक मुद्दे१०२९ जागांसाठी २११२ विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज : प्रवेश घेण्याची मुदत २० जूनपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायमविना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. जिल्ह्यातील १०२९ विद्यार्थ्यांना आरटीई २५ टक्के अंतर्गत मोफत प्रवेश मिळावा, यासाठी २ हजार ११२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज केले होते. तर तिसºया सोडतीत १८३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ मधील कलम १२ नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना खाजगी विना अनुदानित नामांकित शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश देण्याची तरतूद आहे. सत्र २०१८-१९ मध्ये आॅनलाईन पध्दतीने राबविली जात आहे. १३७ शाळांनी बालकांना प्रवेश देण्याकरीता शाळांची नोंदणी केली आहे. १३७ शाळांमधील १०२९ जागेकरीता २ हजार ११२ पालकांनी आॅनलाईन प्रवेश नोंदणी केली आहे.सदर प्रक्रियेचा पहिला ड्रा (लॉटरी) १२ मार्च रोजी झाला. त्यानंतर पुन्हा १९ एप्रिलला ही सोडत झाली. दोन्ही सोडतीत १००६ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यातील ८२४ विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला आहे.तिसरी सोडत १२ जूनला काढण्यात आली. यात १८३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.या विद्यार्थ्यांची नावे २० जूनपर्यंत दिलेल्या शाळेत दाखल करायची आहेत. यासाठी पालकांनी त्यांच्या मोबाईलवर आलेले संदेश मिटवू नये. पालकांनी शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे आवश्यक आहे.सबळ कारणांशिवाय प्रवेश नाकारता येणार नाहीकोणत्याही सबळ कारणाअभावी शाळेला प्रवेश नाकारता येणार नाही. प्रवेश नाकारणारी शाळा कायदेशीर कारवाईस पात्र राहणार आहे. ३० सप्टेंबर २०१८ रोजी पाल्याचे वय (विद्यार्थ्याचे) कमीत कमी ५ वर्ष ८ महिने पूर्ण असावे, ६ वर्ष ११ महिने २९ दिवस पेक्षा अधिक असू नये.

टॅग्स :educationशैक्षणिक