शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

दरेकसात मलेरियाचे १७७ रूग्ण

By admin | Updated: September 4, 2014 23:53 IST

सालेकसा तालुक्याच्या दरेकसा परिसरातील आठ गावे हिवतापाच्या सावटात आहेत. या गावांची अती जोखमेची गावे म्हणून निवड करण्यात आली आहे. दरेकसा येथे १४ रूग्ण, मुरकुटडोह १९, दंडारी १५,

आठ महिन्यांत आढळले : दिल्लीची चमू दाखल गोंदिया : सालेकसा तालुक्याच्या दरेकसा परिसरातील आठ गावे हिवतापाच्या सावटात आहेत. या गावांची अती जोखमेची गावे म्हणून निवड करण्यात आली आहे. दरेकसा येथे १४ रूग्ण, मुरकुटडोह १९, दंडारी १५, जमाकुडो २३, धनेगाव १२, दलदलकुही ११, पिपरीया १६ तर नवाटोला या गावात १५ रूग्ण सद्य स्थितीत आहेत. तर जानेवारी ते ३० आॅगस्ट या काळात एकूण ७२७१ जणांचे रक्त नमुने घेण्यात आले असून यात १७७ रुग्ण मलेरियाने ग्रसीत असल्याचे अहवालातून पुढे आले आहे.केंद्र शासनाच्या क्षेत्रीय जनजाती आयुर्विज्ञान अनुसंधान केंद्र, स्वास्थ अनुसंधान विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी हिवतापाची त्वरीत तपासणी, त्यांची गुणवत्ता पडताळणी करण्याकरिता भारतात आठ राज्यांची निवड केली आहे. यात महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, आसाम, ओरीसा व राजस्थान या आठ राज्यांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून त्यात गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे.गोंदिया जिल्ह्यातील अतीदुर्गम, नक्षलग्रस्त, आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा येथे हिवतापाचे रुग्ण सर्वात जास्त निघत आहेत. त्यांची कारणमिमांसा व शिघ्र तपासणी कीट यांची गुणवत्ता, पडताळणी करण्याकरिता ‘सी’ रिजनल मेडीकल रिर्सच सेंटर फॉर ट्रायबल इंडियन कौंसील आॅफ मेडीकल रिसर्च, जबलपूरचे (म.प्र.)े शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण के. भारती, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयागशील डोगरा, डाटा मॅनेजर एम.पी. सिंग ही तीन सदस्यीय चमू बुधवारी (दि.२ ) जिल्ह्यात दाखल झाली. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सलील पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक अनंतवार, प्रा. आ. केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. दीपक चिमणे, वैद्यकिय अधिकारी डॉ. आर.पी. हेडाऊ हे या परिसरात तपासणी व निरीक्षण करीत आहेत. दरेकसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात चमूतील प्रयोगशाळा तंत्रज्ञ डोगरा हे दोन महिने दरेकसा येथे वास्तव्यास राहणार आहेत. त्यांनी हिवतापाचे १०० दुषीत रक्त नमुने तपासणी करण्याकरिता जबलपुर येथील प्रयोगशाळेत पाठविणार आहेत. जानेवारी ते ३० आॅगस्ट दरम्यान एकूण सात हजार २७१ जणांचे रक्त नमुने घेण्यात आले आहेत. यात १७७ नमुने दुषीत आढळून आले आहेत. यामध्ये टीवी ७७ व पीएफ १०० चे रुग्ण आहेत. गोंदिया जिल्ह्यात हिवताप रुग्णांचे प्रमाण सर्वात जास्त दरेकसा येथे आहे. प्रा. आ. केंद्रातील वैद्यकिय अधिकारी व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी दुषीत निघालेल्या हिवतापाच्या रुग्णांकडे विशेष लक्ष दिले आहे. त्या रूग्णांचा समूळ उपचार करून १७७ रुग्णांचे प्राण वाचविल्याबद्दल भारत सरकारच्या चमूने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनंतवार, डॉ. चिमणे व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.या चमूसोबत जिल्हा हिवताप कार्यालयाचे कर्मचारी नरेंद्र गुप्ता, पर्यवेक्षक दिपक कुंभरे, एल.जी. निपाने, ए.बी. सीरपुरवार, संजय गुप्ता, पी.एफ . कटरे, योगीता वावरे, आर.एन. प्रसाद, अनीता गोडसेलवार, एम.डी. रंगारी, एच.आर. भरणे, एल.डी. भुसारे, आर.डी. समरीत, आर.डब्ल्यू. दोनोडे, व्ही.एल. राधोर्ते, सेलोकर, एस.डी. उके. पी.पी. पटले, ए.डी. पटले. बी.पी. मेश्राम, फुंडे, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील मनोज वाहने, एम.बी.तिवारी, ए.एस. रहमतकर, एस.के. दोनोडे, चौरागडे, कमल गंगभोज आहेत. (तालुका प्रतिनिधी)