शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बाधितांच्या 174 उच्चांकी आकड्याची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 05:00 IST

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी १६७० चाचण्या करण्यात आल्या. यात १४०६ जणांची आरटीपीसीआर, तर २६४ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १७४ नमुने कोरोनाबाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४.९६ टक्के आहे. मंगळवारी बाधितांच्या संख्येत थोड्या प्रमाणात घट झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, बुधवारी रुग्ण संख्येने उच्चांक गाठल्याने जिल्हावासीयांची काळजी वाढविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील चार-पाच दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. चार दिवसांत ४०० बाधितांची नोंद झाली आहे. बुधवारी (दि. १२) जिल्ह्यात तब्बल १७४ बाधितांची नोंद झाली असून, गेल्या पंधरा दिवसांतील या उच्चांकी आकड्याची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यावासीयांना अधिक सर्तक होत काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी १६७० चाचण्या करण्यात आल्या. यात १४०६ जणांची आरटीपीसीआर, तर २६४ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १७४ नमुने कोरोनाबाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४.९६ टक्के आहे. मंगळवारी बाधितांच्या संख्येत थोड्या प्रमाणात घट झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, बुधवारी रुग्ण संख्येने उच्चांक गाठल्याने जिल्हावासीयांची काळजी वाढविली आहे. त्यातच गोंदिया आणि आमगाव तालुक्यात रुग्णसंख्येत अधिक वाढ होत असल्याने दोन्ही तालुके कोरोनाचे हाटस्पॉट झाले आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४८१७४५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात २५५५८७ नमुन्याची आरटीपीसीआर, तर २२६१५८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१७९१ नमुने कोरोना बाधित आढळले. यापैकी ४०५८१ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. उपचार घेत असलेल्या १४ बाधितांनी कोरोनावर मात केली.

 गोंदिया  डेंजर झोनमध्ये- जिल्ह्यात सर्वाधिक ३२२ रुग्णांची नोंद गोंदिया तालुक्यात झाली आहे. तर, आमगाव ६० आणि सालेकसा तालुक्यात ३९ रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण गोंदिया तालुक्यात आढळत असल्याने हा तालुका कोरोनाचा हाटस्पॉट झाला असून डेंजर झोनमध्ये गेला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. 

रुग्णालयात केवळ ३७ रुग्ण - जिल्ह्यात सध्यस्थितीत ४९५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, यापैकी केवळ ३७ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत तर उर्वरित रुग्ण गृहविलगीकरणात आहे. या रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने त्यांना गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जात आहे. 

पॉझिटिव्हिटी रेट वाढतोय कोरोनाबाधितांच्या संख्येत मागील आठवडाभरापासून सातत्याने वाढ होत असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ४९५ पोहोचला असून त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ८.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही निश्चित थोडी चिंताजनक बाब आहे. १०० नमुने पाठविणार - ओमायक्रॉनच्या अनुषंगाने चाचणी करण्यासाठी दिल्ली व पुणे येथील प्रयोगशाळेत १०० नमुने पाठविण्यात येणार आहे.

निर्बंध नको असतील तर नियमांचे करा पालन - कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात झपाट्याने वाढत असून अद्यापही ही बाब जिल्हावासीयांनी गांभीर्याने घेतलेली नाही. त्यामुळे निर्बंधात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कडक निर्बंध नको असतील तर नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची गरज आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या