शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

१७ कोटींच्या निविदा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:21 AM

शहरातील विविध कामांसाठी नगर परिषदेने बोलाविलेल्या १७ कोटींच्या सुमारे ७३ कामांच्या निविदा वांद्यात आल्या. काही निवडक कंत्राटदारांना कामे मिळावी यासाठी त्यांच्या सोयीच्या अटी व शर्ती ऐनवेळी लावण्यात आल्याचेही कंत्राटदारांकडूनच बोलले जात आहे.

ठळक मुद्देमोठ्या प्रमाणात सेटिंग : विशेष सभेत दिली जाणार होती मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील विविध कामांसाठी नगर परिषदेने बोलाविलेल्या १७ कोटींच्या सुमारे ७३ कामांच्या निविदा वांद्यात आल्या. काही निवडक कंत्राटदारांना कामे मिळावी यासाठी त्यांच्या सोयीच्या अटी व शर्ती ऐनवेळी लावण्यात आल्याचेही कंत्राटदारांकडूनच बोलले जात आहे. तर सोमवारी (दि.१५) बोलाविण्यात आलेल्या विशेष आमसभेत या निविदांना मंजुरी दिली जाणार होती. मात्र कंत्राटदारांनी कोर्टात धाव घेतल्याने ऐनवेळी विशेष सभाच तहकूब करण्यात आल्याचेही नगर परिषद वर्तुळात बोलले जात आहे. परिणामी पालिकेने बोलाविलेल्या या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.प्राप्त माहितीनुसार, नगर परिषदेने विविध बांधकामांसाठी सुमारे १७ कोटींच्या निविदा काढल्या होत्या. ७३ कामांसाठी बोलाविण्यात आलेल्या या निविदांत पाच कोटींची डांबरीकरण तर १२ कोटींची सिमेंट रस्ते व नालींची कामे होती. यासाठी ५० लाखांपेक्षा जास्त व ५० लाखांपेक्षा कमी अशा दोन भागांत निविदा काढल्या होत्या. यात ५० लाखांपेक्षा जास्त रकमेची ११ तर ५० लाखांपेक्षा कमी रकमेची ६२ कामे होती. यातील ११ कामांसाठी २ डिसेंबर २०१७ रोजी तर ६२ कामांसाठी १८ डिसेंबर २०१७ रोजी निविदा काढण्यात आली होती व यासाठी निविदा टाकण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०१७ ठेवण्यात आली होती. असे असताना या कामांची तारीख शुद्धीपत्रक काढून ६ जानेवारी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा वाढवून ८ जानेवारी, त्यानंतर १२ जानेवारी व त्यानंतर १३ जानेवारी शेवटची तारीख देण्यात आली. विशेष म्हणजे, यादरम्यान १२ जानेवारी रोजी शुद्धीपत्रक काढून रेडी मिक्स कॉंक्रेट प्लांटची (आरएमसी) ५ किमी. अंतराची अट टाकण्यात आली. येथे विना कारण निविदांची तारीख वाढविण्यात आली. शिवाय आरएमसीची अट अगोदरच टाकायची होती. मात्र ती ऐनवेळी टाकण्यात आली, यामुळे कंत्राटदारांत चांगलाच रोष खदखदत होता. काही लाडक्या कंत्राटदारांनाच कामे द्यावयाची असल्याने हे सर्व केले जात असल्याचे अन्य कंत्राटदार जाणून होते.विशेष म्हणजे, हा सर्व कारभार झाल्यानंतर नगराध्यक्षांनी सोमवारी (दि.१५) बोलाविलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत या निविदांना मंजुरी देण्यात येणार होती. मात्र या निविदांमध्ये होत असलेल्या घोटाळ््याला घेऊन काही कंत्राटदारांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली. तर कंत्राटदार कोमल नारायणप्रसाद कटारे व लखन धावडे यांनी सोमवारी (दि.१५) नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयाने या निविदांत न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत कार्यादेश देता येणार नाही असे आदेश सुनावल्याची माहिती आहे.तीनच कंत्राटदारांना दिले प्रमाणपत्रनिविदांमध्ये टाकण्यात आलेल्या आरएमसी प्लांटच्या अटीनुसार संबंधीत कंत्राटदारांना नगर परिषद अभियंत्यांकडून प्रमाणपत्र घ्यावयाचे होते. येथे फक्त तीनच कंत्राटदारांना आरएमसी प्लांट असल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचेही बोलले जात आहे. फक्त तिघांनाच हे प्रमाणपत्र देणे म्हणजे कोठे तरी पाणी मूरत असल्याची चर्चा नगर परिषदेत सुरू आहे. तर दुसरीकडे नगर परिषद अभियंत्याचा प्रभार असलेले बारई यांना विचारणा केली असता त्यांनी कोणत्या कंत्राटदारांना प्रमाणपत्र दिले त्यांचे नाव आठवत नसल्याचे सांगीतले.तडकाफडकी निविदा केल्या रद्दनिविदांमधील घोळामुळे झालेल्या या प्रकाराला घेऊन सोमवारीच (दि.१५) तडकाफडकी निविदा रद्द करण्यात आल्या. तर यासाठी काढण्यात आलेल्या शुद्धीपत्रात, १२ जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या शुद्धीपत्रात २३ जानेवारी पर्यंत मुदतवाढ करणे होते. मात्र अनावधानाने २३ जानेवारी ऐवजी १३ जानेवारी टायपींगच्या चुकीमुळे झाले असून त्यामुळे निविदा रद्द करण्यात आल्याचे नमूद आहे.