शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

१६ विद्यार्थ्यांचा आज सुवर्णपदकाने गौरव

By admin | Updated: February 8, 2015 23:34 IST

शिक्षण महर्षी मनोहरभाई पटेल यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त गोंदियात सोमवारी (दि.९) होत असलेल्या शानदार सोहळ्यात ज्येष्ठ क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते १६ विद्यार्थ्यांना

मनोहरभाई जयंती : सचिन तेंडुलकर, हिराणींची उपस्थितीगोंदिया : शिक्षण महर्षी मनोहरभाई पटेल यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त गोंदियात सोमवारी (दि.९) होत असलेल्या शानदार सोहळ्यात ज्येष्ठ क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते १६ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने गौरविण्यात येणार आहे. येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी १२ वाजता हा सोहळा होणार आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री खा.प्रफुल्ल पटेल, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, एशिया पॅसिफिकचे अध्यक्ष व मॅककेन वर्ल्डग्रुप इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसुन जोशी, आ.गोपालदास अग्रवाल, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, माजी राज्यमंत्री विलासराव शृंभारपवार, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आ. दिलीप बंसोड, माजी आ. रामरतन राऊत, माजी आ. अनिल बावणकर, माजी आ. सेवक वाघाये, माजी आ. मधूकर कुकडे, मनोहरभाई पटेल अकादमीचे अध्यक्ष वर्षा पटेल उपस्थित राहतील. सुवर्णपदक वितरण समारंभाची तयारी आ.राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भंडारा व गोंदिया जिल्ह्यात शालांत व पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्व.मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्णपदक देऊन गौरविले जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)