शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात यावर्षी १.५ लाख वृक्ष लागवड

By admin | Updated: July 31, 2015 02:01 IST

वृक्ष कटाईमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यात वृक्ष लागवड केली जाते.

गोंदिया : वृक्ष कटाईमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यात वृक्ष लागवड केली जाते. मात्र यापैकी किती वृक्ष जगतात व किती मरतात, हा शोधाचा विषय ठरत आहे. दरवर्षी लागवड केलेल्या रोपट्यांपैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक रोपटे जगतात, असे सामाजिक वनीकरण विभागाचे म्हणणे आहे. परंतु यात कितपत सत्यता आहे हे लागवड झालेल्या गावांनाच ठाऊक!यंदा सामाजिक वनीकरण विभागाला एक लाख नऊ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी एक लाख पाच हजार ७०० वृक्षांची लागवड पूर्ण झालेली असून काम सुरूच असल्याचे सांगण्यात आले आहे. एक रोपटे लावण्यासाठी जवळपास ४५० रूपयांचे खर्च येते. यात रोपटे, पिंजरे, खड्डे व पाणी देणे या बाबींचा समावेश असतो. मात्र खरे काम वृक्ष लागवडीनंतर त्याचे संरक्षण व संवर्धनाचे असते. याकडे किती लक्ष दिले जाते, हासुद्धा शोधाचाच विषय.दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात वृक्षारोपण केले जाते. जिल्ह्यात सन २०१२ मध्ये एकूण ७७ हजार ६८२ वृक्षांची लागवड करण्यात आली होती. यापैकी ७६ हजार ५०२ रोपटे जगले असून याची टक्केवारी ९८ आहे. सन २०१३ मध्ये ८५ हजार ९०३ वृक्षांची लागवड करण्यात आली होती. यापैकी ७९ हजार ९८५ रोपटे जगले असून याची टक्केवारी ९३ आहे. तर सन २०१४ मध्ये ७३ हजार ४६८ वृक्षांची लागवड जिल्ह्यात करण्यात आली होती. यापैकी ६८ हजार ४३८ रोपटे जगले असून याची टक्केवारी ९३ असल्याचे सामाजिक वनीकरण विभागातून सांगण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागातर्फे दरवर्षी जिल्ह्यात वृक्ष लागवड केली जाते. मात्र वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाच्या तुलनेत तेवढी जागा उपलब्ध असते का? याबाबत विचारणा केल्यावर आम्हाला त्याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरणाचे वृक्ष लागवड, संरक्षण व संवर्धनाचे उद्दिष्ट कागदावर साध्य होते की खरोखर कृत्यातून होते, यावर प्रश्नचिन्ह आहे. (प्रतिनिधी)