शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

पर्यटन विकासासाठी १५ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 21:56 IST

जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नवेगावबांध, प्रतापगड व मुरदोली येथील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी प्रत्येक स्थळाला पाच कोटी प्रमाणे १५ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे.

ठळक मुद्देजिल्हा ठरणार पर्यटकांसाठी मेजवानी : भूमी अधिग्रहणासाठी पालकमंत्र्यांनी केला दौरा

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नवेगावबांध, प्रतापगड व मुरदोली येथील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी प्रत्येक स्थळाला पाच कोटी प्रमाणे १५ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. शनिवारी (दि.१४) त्यांनी या तिन्ही स्थळांना भेट देऊन जमीन अधिग्रहित करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांसह पाहणी केली आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या ऐतिहासीक प्रतापगड, नवेगावबांध राष्टÑीय उद्यानातही पर्यटन संकुल तर गोरेगाव तालुक्यातील ग्राम मुरदोली येथे जंगल परिसराला लागून असलेल्या तलाव, रोपवाटिका व विश्रामगृह असून निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या जागेचा विकास केला जाणार आहे. यासाठी या तिन्ही स्थळांसाठी प्रत्येकी पाच कोेटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या तिन्ही स्थळांचा विकास राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या अंतर्गत करण्यात येणार आहे. मुरदोली येथे सेंटर रेस्टॉरेन्ट, दोन पर्यटक कक्ष, इनफोरमल स्टोरिंग, संरक्षण भिंत, सिक्युरिटी कॅबीन, लॉन, बंधारा, वाहनतळ, पाथवे, पोचमार्ग, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण आदी विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. याच धर्तीवर प्रतापगडचाही पर्यटन विकास करण्यात येणार आहे.यासाठी या तिन्ही स्थळांना भेट देऊन भुमी अधिग्रहीत करण्यासाठी पालकमंत्र्यांनी अधिकाºयांसह प्रत्यक्ष पाहणी केली.याप्रसंगी त्यांनी जमीन अधिग्रहीत करून लवकरात लवकर कामाला सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या. निधी परत जाणार नाही. याची संबंधित अधिकाºयांनी काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. या वेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, उपवनसंरक्षक एस.युवराज, उपजिल्हाधिकारी आंधळे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता छप्परधरे, लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वकर्मा, राज्य पर्यटन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक हेडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गाणार, जिल्हा नियोजन अधिकारी भुते, गोरेगावचे उपविभागीय अधिकारी तळपदे, तहसीलदार हिंगे, अर्जुनी-मोरगावचे धनंजय देशमुख, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, प्रतापगडच्या सरपंच अहिल्या वालदे, जि.प. सदस्या रचना गहाणे, नवेगावबांधचे सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, नवेगावबांध फाऊंडेशनचे सचिव रामदास बोरकर, दरगाह कमेटीचे सदस्य भोजू लोगडे, विनोद नाकाडे, संदीप कापगते, व्यंकट खोब्रागडे व सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.या वेळी फाऊंडेशनच्या सदस्यांनी पर्यटन विकासाची कामे लवकारात लवकर सुरू करण्याची मागणी केली.सात ते आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राष्ट्रीय उद्यान पर्यटक संकुल परिसरातील मंजूर कामे सात-आठ महिने लोटूनही सुरु झाली नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी या मंजूर कामाकडे हेतु पुरस्सर केलेले दुर्लक्ष व संबंधित विभागांत नसलेला ताळमेळ हा या राष्ट्रीय उद्यानाचा विकास रखडविण्यासाठी कारणीभूत आहे. पालकमंत्र्यांनी यात लक्ष देवून मंजूर कामे सुरु करावी. तसेच त्यांनी खेचून आणलेला निधी खर्च झाला पाहिजे. निधी अखर्चित राहून परत जावू नये. याची काळजी घ्यावी.-रामदास बोरकरसचिव, नवेगावबांध फाऊंडेशनउपवनसंरक्षक व जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय उद्यान पर्यटक संकुलातील मंजूर विकास कामे लवकर सुरु करावी. निधी उपलब्ध असताना होणारा विलंब संतापजनक आहे. पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करवून दिला असताना विकासकामे लवकर व्हावीत. मात्र विकासाची गाडी कुठे अडली आहे. याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे. संयुक्त वन व्यवस्थापन समिती अंतर्गत कामे निविदा काढून लवकरच सुरु केली जातील.-अनिरूद्ध शहारेअध्यक्ष तथा सरपंच, संयुक्त वन व्यवस्थापन समिती, नवेगावबांध