शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
4
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
5
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
6
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
7
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
8
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
9
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
10
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
11
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
13
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
14
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
15
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
16
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
17
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
18
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
19
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
20
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
Daily Top 2Weekly Top 5

१३६७ शाळांत ‘तंबाखूबंदी’ला तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 21:41 IST

विद्यार्थी व्यसनाच्या गर्ततेत जाऊ नये यासाठी लहानपणापासून जडणाऱ्या तंबाखू या व्यसनापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात शिक्षण विभागाने शासनाच्या निर्देशानुसार राबविलेल्या उपक्रमात गोंदिया जिल्ह्यातील १ हजार ६८१ शाळांपैकी शासनाच्या ११ निकषात खऱ्या उतरणाऱ्या जिल्ह्यातील फक्त ३१४ शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : १५ आगस्टपर्यंत सर्व शाळांमध्ये तंबाखूबंदी करा

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विद्यार्थी व्यसनाच्या गर्ततेत जाऊ नये यासाठी लहानपणापासून जडणाऱ्या तंबाखू या व्यसनापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात शिक्षण विभागाने शासनाच्या निर्देशानुसार राबविलेल्या उपक्रमात गोंदिया जिल्ह्यातील १ हजार ६८१ शाळांपैकी शासनाच्या ११ निकषात खऱ्या  उतरणाऱ्या जिल्ह्यातील फक्त ३१४ शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. तंबाखूला जवळ येऊ देणार नाही अशी शपथ विद्यार्थ्यांनाही देण्यात आली आहे. परंतु ११ निकषात आजही १३६७ शाळा बसल्या नाहीत.कर्करोगासारखा असाध्य रोग हा तंबाखूपासून जडत असते. तरीही टाईमपासच्या नावावर तंबाखूचे लागलेले व्यक्तीला मरणाच्या वाटेवर नेऊन सोडते. तरीही गोंदिया जिल्ह्यात तंबाखू खाणाऱ्यांची संख्या लाखावर आहे. येणारी पिढी तंबाखूच्या आहारी जाऊ नये यासाठी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाने ७ नोव्हेंबर २०१५ ला पाठविलेल्या पत्रात शाळा तंबाखूमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले होते.त्यानुसार शिक्षण विभागाने प्रत्येक शाळांना पत्र पाठवून तंबाखूमुक्त शाळा करण्यास सांगितले. त्यांच्या सुचनेनुसार गोंदिया जिल्ह्यातील १ हजार ६८१ शाळांपैकी ११ निकषपूर्ण करणाºया अ‍ॅपवर ११७७ शाळांनी नोंदणी केली. त्यातील ७२५ शाळांनी स्वत:ला तंबाखूमुक्त दाखविले परंतु त्या शाळा अजूनपर्यंत ११ निकषात न बसल्यामुळे त्यांना त्या अ‍ॅपद्वारे रद्द करण्यात आले. ११ निकष न भरलेल्या १३८ शाळा आहेत. फक्त ३१४ शाळा तंबाखूमुक्त म्हणून घोषीत करण्यात आल्या आहेत.त्यात गोंदिया १२६, आमगाव ३७, तिरोडा २३, सडक-अर्जुनी २४, सालेकसा १२, अर्जुनी-मोरगाव ३४, देवरी ३७, गोरेगाव २१ शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्या आहेत. ३२ टक्के शाळांनी तंबाखूमुक्त शाळा या अ‍ॅपमध्ये नोंदणीच केली नाही. त्या शाळांवर काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.तंबाखू विक्री करणाऱ्यांवर आता फौजदारी कारवाईतंबाखू विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी पोलिसांना सोबत घेऊन त्यांच्यावर कारवाई करा असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी तंबाखुमुक्त अभियान चालविणाऱ्या मोहीमेच्या सदस्यांना दिले आहे. सोबतच तंबाखू चघळणाऱ्या शिक्षकांनाही तंबाखू सोडा अन्यथा कारवाईस तयार व्हा अशी फटकारले आहे.दंडात्मक कारवाईशाळेत तंबाखू खातांना विद्यार्थी, शिक्षक किंवा कर्मचारी आढळले तर त्यांना २०० रूपये दंड म्हणून आकारण्याचा नियम तयार करण्यात आला आहे. शाळेच्या परिसरात १०० मीटरच्या अंतरात तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास बंदी आहे. गोंदिया जिल्ह्यातील १६८१ शाळांतील २ लाख ५० हजार विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त जीवनाची शपथ शिक्षण विभागाकडून देण्यात आली. त्यानुसार शाळा तंबाखूमुक्त करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला.दाभना हे एकमेव तंबाखूमुक्त गावअर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या दाभना या गावाने तंबाखुमुक्त गाव म्हणून ठराव घेतला आहे.जिल्ह्यातील पहिले तंबाखुमुक्त गाव म्हणून हे गाव पुढे आले आहे. दुसऱ्या गावांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे.