शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

13 नंतर निवडणूक रद्द होणार की रंगत येणार! उत्सुकता शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 05:00 IST

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली आहे. या निर्णयावर १३ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. तर, राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जि.प.च्या १० व पं.स.च्या २० आणि नगरपंचायतींच्या ६ ओबीसी प्रवर्गाच्या जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया झाली आहे. तर, १३ डिसेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतरच निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तर, ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णयसुद्धा १३ डिसेंबरलाच होणार आहे. त्यामुळे या निवडणुका रद्द होतात की निवडणुका होतात, यानंतरच यात रंगत येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली आहे. या निर्णयावर १३ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. तर, राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जि.प.च्या १० व पं.स.च्या २० आणि नगरपंचायतींच्या ६ ओबीसी प्रवर्गाच्या जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. तर, ओबीसी जागा वगळून निवडणुका न घेता त्या स्थगित करण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून केली जात आहे. तर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस १३ डिसेंबरला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणुका रद्द होतात की ओबीसी जागा वगळून निवडणुका होतात, यावरच या निवडणुकांमधील रंगत कळणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या १३ डिसेंबरच्या सुनावणीवरच या निवडणुकांचे भविष्य ठरणार आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. 

राजकीय पक्षांच्या भूमिककडे लक्ष - १३ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावर सुनावणी होणार आहे. याचा काय निर्णय लागयचा तो लागेल. मात्र, ओबीसी जागा वगळून निवडणूक घेण्याची वेळ आल्यास आता आक्रमक असलेले सर्वच राजकीय पक्ष नेमकी काय भूमिका घेतात, हे देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे याकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे. बंडखोरांची मनधरणी सुरू - जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षातील काही सदस्यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याचा फटका पक्षाच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे १३ डिसेंबरपूर्वी या बंडखोर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी त्यांची मनधरणी करणे सुरू असल्याचे चित्र आहे. 

सर्वच निवडणूक रद्द करण्याच्या भूमिकेत - ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणुका घेतल्या आणि त्याचा निकाल लागला, तरी जोपर्यंत या ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णय होत नाही, तोपर्यंत पदाधिकारी पदारुढ होणार नाही. त्यामुळे निवडून आलेले सदस्य केवळ नामधारी राहणार आहेत. त्यामुळे निवडणुका घेण्याऐवजी सर्वच निवडणुका स्थगित करून त्या एकत्रित घेण्याची मागणी केली जात आहे. 

निवडणूक यंत्रणेची तारांबळ- जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आणि अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, ओबीसी जागा वगळून अर्जांची छाननी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिल्याने जिल्हा निवडणूक यंत्रणेची सुद्धा तारांबळ उडाली. दाखल उमेदवारी अर्जांची संख्या आणि किती अर्ज बाद झाले याची माहिती एक दिवस उशिराने देण्याची वेळ आली तर जिल्हा निवडणूक यंत्रणेचे काम सुद्धा यामुळे वाढले होते. 

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद