शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
5
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
6
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
7
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
8
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
9
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
10
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
11
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
12
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
13
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
14
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
15
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
16
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
17
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
18
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
19
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
20
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

वाहतूक नियम तोडणाऱ्यांचे १.२८ लाख रुपये थकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:19 IST

गोंदिया : वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असून, नियम तोडल्यास त्याचे परिणाम कधी-कधी अंगलट येतात. मात्र, याही पेक्षा दु:खाची ...

गोंदिया : वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असून, नियम तोडल्यास त्याचे परिणाम कधी-कधी अंगलट येतात. मात्र, याही पेक्षा दु:खाची बाब म्हणजे एखाद्या बेजबाबदार व्यक्तीच्या चुकीची शिक्षा निरपराध व्यक्तीला भोगावी लागते. वाहतूक अपघातांतील बहुतांश प्रकरणांतील हीच स्थिती असते. यामुळेच वाहतूक अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेला नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार वाहतूक नियंत्रण शाखेकडून नियम तोडणाऱ्यांवर विविध कलमांतर्गत कारवाया केल्या जात असून, यात अधिकांश प्रकरणांत दंडात्मक कारवाया केल्या जातात. जिल्ह्यात त्यानुसार, वाहतूक नियंत्रण शाखेने सन २०२१ मध्ये विविध प्रकारांत १३२०० दंडात्मक कारवाया केल्या आहेत. यातील १२६७५ कारवायांतील २७ लाख ५६ हजार ०५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर ५२५ कारवायांतील एक लाख २८ हजार १०० रुपयांचा दंड अद्यापही संबंधितांवर थकून आहे.

----------------------------------

२०२१ मधील आकडेवारी काय सांगते

- किती जणांनी तोडला नियम - १३२००

एकूण दंडाची रक्कम -२८८४१००

किती व्यक्तींनी भरला दंड -१२६७५

भरलेला दंड - २७५६०५०

किती व्यक्तींनी दंड भरलाच नाही - ५२५

थकबाकी दंडाची रक्कम - १२८१००

१) २०२०-२०२१ मध्ये झालेली कारवाई (ग्राफ)

२०२०-२०२१

विना हेल्मेट १९

विना सीटबेल्ट २४२५

ओव्हर स्पीड १५७

मोबाईलवर बोलणे ३०

नो पार्किंग २१९

ट्रिपल सीट ४१०

विना लायसन्स ८३३३

फॅन्सी नंबर प्लेट १६

म्युझिकल हॉर्न ४९

--------------------------------

परवाना नसलेल्यांवरच सर्वाधिक कारवाया

- सध्या विद्यार्थ्यांच्या सकाळपासूनच ट्यूशन क्लासेस सुरू होत असून, त्यांना दिवसभर धावपळ करावी लागते. अशात पालक आपल्या पाल्यांच्या सोयीसाठी वाहन खरेदी करून त्यांना देत आहेत. मात्र, हे करताना त्यांचा परवाना आहे की नाही याकडे लक्ष देत नाहीत.

- आजघडीला ५००-१००० रुपये भरले तर गाडी आपल्या घरात आणता येते अशी सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे प्रत्येकाकडे आता दुचाकी झाली आहे. मात्र, दुचाकी घेऊनच होत नसून त्यासाठी परवाना काढावा लागतो याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नाही.

- परवाना नसल्यास वाहतूक पोलिसांकडून जास्तीत जास्त १०० रुपयांचे चलन होत असल्याचा समज आजही कित्येक नागरिकांत आहे. त्यामुळे परवाना काढण्याची भानगड पाळण्यापेक्षा १०० रुपये दिलेले बरे अशा तोऱ्यात ते वागतात.

----------------------------

लवकर दंड न भरल्यास...

- वाहतूक नियंत्रण शाखेने एखाद्या वाहनावर कारवाई केल्यानंतर त्याने दंडाची रक्कम कित्येक दिवस भरली नसली तरीही त्यावर व्याज लावता येत नही. आहे ती रक्कमच नियमानुसार घ्यावी लागते.

- एखाद्या व्यक्तीने दंडात्मक कारवाई झाल्यावर पैसे न भरल्यास वाहतूक नियंत्रण शाखा दंडाची रक्कम वाढवू शकत नाही. यामुळेही कित्येकांकडून दंड थकविला जातो.

- मात्र, दंडाची रक्कम थकवून असलेली व्यक्ती दुसऱ्यांदा वाहतूक पोलिसांच्या हाती लागल्यास त्याची माहिती मशीनद्वारे उपलब्ध होते व अशात वाहन जप्त केले जाते. जुनी रक्कम वसूल झाल्यावर ते वाहन सोडले जाते.