शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आणखी हवेत १२४९ पोलीस

By admin | Updated: September 7, 2016 00:21 IST

पोलीस दलाला व्यावसायिक काम करण्यासाठी पोषक ठरणाऱ्या मॅकेन्झी अहवालानुसार गोंदिया जिल्ह्यात आजघडीला आणखी

मॅकेन्झी अहवाल : पोलिसांच्या कार्यप्रणालीत सुसूत्रता, नक्षल क्षेत्रासाठी सुचविल्या सुधारणानरेश रहिले  गोंदियापोलीस दलाला व्यावसायिक काम करण्यासाठी पोषक ठरणाऱ्या मॅकेन्झी अहवालानुसार गोंदिया जिल्ह्यात आजघडीला आणखी १२४९ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची गरज आहे. यातून पोलिसांच्या कामात सुसूत्रता आणून कार्यप्रणालीत आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.पोलिसांवरील ताण कमी करण्याचे आव्हान सध्या गृह विभागावर आहे. यामध्ये मनुष्यबळाचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी अमेरिकन कन्सलटन्सी कंपनी मॅकेन्झीने राज्य शासनाला एक अहवाल सादर केला होता. त्यात सध्या असलेल्या कार्यप्रणालीत सुधारणा आणण्यासाठी, पोलिसांचे मॅनेजमेंट तसेच पोलिसांच्या साप्ताहिक सुट्या, टपाल ड्युटी, कल्याण निधीतून त्यांच्यासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम यांचा सांगोपांग अभ्यास करण्यात आला.मॅकेन्झी अहवालानुसार गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त व आदिवासी असल्याने या जिल्ह्यात किती मनुष्यबळ असावे हे मॅकेन्झी अहवालाने दाखविले आहे. त्यानुसार जिल्ह्यात आणखी ६ पोलीस निरीक्षक, १६१ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, ७६ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ३६७ पोलीस हवालदार तसेच ६३९ पोलीस शिपाई असे एकूण १२४९ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे सांगण्यात येते.नक्षलप्रभावित गोंदिया जिल्ह्यात या अहवालानुसार नक्षलविरोधी कारवायांमध्ये आणखी सुधारणा करून त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात केली जाणार आहे. यातून पोलिसांवरील ताण कमी होईल.