शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

१२ लाख ७० हजार रोपटे लावणार

By admin | Updated: June 14, 2017 00:32 IST

जिल्ह्यात १ ते ७ जुलै या काळात १२ लाख ७० हजार रोपट्यांची लागवड केली जाणार आहे.

३१ लाख रोपटे सज्ज : पत्रपरिषदेत जिल्हाधिकाऱ्यांची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यात १ ते ७ जुलै या काळात १२ लाख ७० हजार रोपट्यांची लागवड केली जाणार आहे. त्यात वनविभाग ५ लाख ९० हजार, सामाजिक वनिकरण एक लाख ५० हजार, वनविकास महामंडळ १ लाख ८० हजार, ग्राम पंचायतींना २ लाख २ हजार तर इतर शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था मिळून १ लाख ४८ हजार रोपटे लावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्र परिषदेत दिली. या वृक्ष लागवडीसाठी ११ लाख ५० हजार खड्डे खोदण्यात आले आहे. विभागानी तीन वर्ष लावलेले रोपटे व खड्डे आॅनलाईन अपलोड केले आहे. वनविभागाने यासाठी एक संगणक कक्ष स्थापन केले आहे. मागच्या वर्षी १० लाख ५० हजार रोपटे लावण्यात आले होते. त्यापैकी ८४ टक्के रोपटे जिवंत असल्याची माहिती देण्यात आली. यावर्षी पेल्टाफोरम, निलगीरी, सप्तपर्णी, एलीफंट, मॅजीयम, सिसु, काशीद यासारख्या वृक्षांची लागवड होणार नसून गोंदिया जिल्ह्यातील वनांमध्ये १९०७ साली गॅजेटमध्ये नोंदविलेल्या तसेच जंगल ट्री आॅफ सेंट्रल इंडिया या पुस्तकात नोंद असलेल्या झाडांची १०० टक्के रोपटी लावावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शासकीय कार्यालयाच्या आवारात जंगलात दुर्मीळ होत असलेल्या वृक्षांची लागवड करावी. वड,पिंपळ, जांभूळ यासारख्या घनदाट सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करावी, शासकीय कार्यालयात १० टक्के रोपटे लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. २५ टक्के रोपटे पशु,पक्ष्यांना वर्षभर खाण्यासाठी उपयोगी पडतील अशा प्रजातीच्या रोपट्यांची लागवड करावी जसे जांभूळ, बेहळा, टेंभरुन, हिरडा, चार, आंबा, बोर, चिंच, मोहई, कुसूम, वड, पिंपळ लावण्याचे आवाहन करण्यात आले. पुढच्या वर्षी १०० टक्के रोपटे पशुपक्ष्यांना खाण्यासाठी उपयोगी पडतील अशा प्रजातीची लागवड केली जाणार आहे. यावेळी उपवनसंरक्षक एस.युवराज उपस्थित होते.