शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
5
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
6
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
7
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
8
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
9
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
10
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
11
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
12
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
13
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
14
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
15
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

सर्वसाधारण योजनेसाठी ११८.३८ कोटी

By admin | Updated: August 18, 2016 00:11 IST

सन २०१६-१७ मधून शासनाने ८६.५७ कोटींच्या आर्थिक मर्यादेत सर्वसाधारण योजना तयार करण्याचे निर्देश दिले होते.

कामे वेळेत पूर्ण करा : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांचे निर्देश गोंदिया : सन २०१६-१७ मधून शासनाने ८६.५७ कोटींच्या आर्थिक मर्यादेत सर्वसाधारण योजना तयार करण्याचे निर्देश दिले होते. पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने या योजनेच्या नियतव्ययात भर पडून ११८ कोटी ३८ लाख इतकी वाढ करण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेतील या निधीचा वेळेत योग्य वापर करून गरजूंना योजनांचा लाभ द्या आणि विकास कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या बैठकीला जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, आमदार गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री म्हणाले, माजी मालगुजारी तलावातील पाण्याचा वापर शेती व मत्स्योत्पादनासाठी व्हावा यासाठी या तलावांच्या दुरूस्तीची कामे पाटबंधारे विभागाने नियोजनातून करावीत, असे सांगून ना.बडोले म्हणाले, त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यासोबतच मासेमारी संस्थांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. जिल्ह्यात दुधाचे संकलन वाढण्यासाठी दुग्ध व्यवसाय विभागाने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ज्या शाळांच्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत त्या इमारतींचे सर्वेक्षण करु न नव्याने इमारती बांधण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यातील बंगाली शाळेतील शिक्षकांचे प्रश्न लवकरच सोडविण्यात येतील. काही भागात धानावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कृषी विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. प्रास्ताविकातून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, सन २०१५-१६ या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजना/अनुसूचित जाती उपयोजना/आदिवासी उपयोजना यावर २२१ कोटी ८ लक्ष रु पये निधी खर्च झाला आहे. जिल्ह्यातील ११ पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ४८ कोटी ४४ लक्ष रुपयांच्या पर्यटन विकास कामांचा प्राधान्य आराखडा प्रस्ताव मंजुरी व निधी उपलब्धतेसाठी सादर केल्याचे त्यांनी सांगितले. सन २०१६-१७ या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २३२ कोटी ३३ लक्ष रु पये नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. सन २०१६-१७ च्या जिल्हा पर्यटन विकासासाठी ३ कोटी ३० लक्ष रु पये निधी मंजूर असून या निधीचा उपयोग जिल्ह्यातील क वर्ग पर्यटन स्थळांच्या विकासासाठी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी दिली. सन २०१६-१७ मध्ये सर्वसाधारण योजनेत ११८ कोटी ३८ लक्ष, अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत ३८ कोटी ६५ लक्ष व आदिवासी उपयोजनेकरीता ७५ कोटी ३० लक्ष, असा एकूण २३२ कोटी ३३ लक्ष नियतव्यय मंजूर आहे. सभेला समितीचे सदस्य शिला इटनकर, ओमप्रकाश येरपुडे, आशा पाटील, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावर, वन्यजीव विभागाचे क्षेत्र संचालक रविकिरण गोवेकर, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण मिहरे, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांचेसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. आभार जिल्हा नियोजन अधिकारी तिडके यांनी मानले.(जिल्हा प्रतिनिधी) - लोकप्रतिनिधींनी मांडल्या सूचना आमदार संजय पुराम यांनी देवरी व सालेकसा तालुक्यात शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावी अशी मागणी यावेळी केली. गोंदिया शहरात माकडांचा, मोकाट जनावरांचा व डुकरांचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होत असल्यामुळे नगरपालिकेने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा आमदार गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केली. आमदार विजय रहांगडाले यांनी जिल्ह्यातील शेतीचे माकडांमुळे व रानडुकरांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी वनविभागाने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.