येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित बेल्ट वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक व फाउंडेशनचे संरक्षक लोकेश यादव, नगरसेवक सचिन शेंडे, ॲड. अनिता दास, अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे सचिव आदेश शर्मा, ग्रामीण संयोजक विकास कापसे, फाउंडेशनचे अध्यक्ष चेतन मानकर, कराटे असोसिएशनचे सचिव सेंसई तेजसिंग आलोट, क्रीडा संघटक अनिल सहारे, सेसई रीना चव्हाण, उपाध्यक्ष सेंसई संगम बावनकर, सेंसई हेमंत चावके, सेंसई मुकेश शेंडे, महेंद्र हेमने उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते परीक्षेत भाग घेणाऱ्या खेळाडूंना बेल्टचे वितरण करून त्यांचा सत्कार करण्यात आला. परीक्षेसाठी सेंसई दीपक सिक्का, अतुल बोरकर, विशाल कामडा, दीपक बिभार, कृष्णा बिभार, गणेश्वर चौधरी, नितेश कुरसुंगे, रवीना बरेले, नायडू, अंकुश गजभिये, निखिल बरबटे यांनी सहकार्य केले. आभार कराटे असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विशालसिंग ठाकूर यांनी मानले.
११० खेळाडूंनी दिली कराटे बेल्ट परीक्षा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:49 IST