शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या ११ उमेदवारांचा खर्च ‘शून्य’

By admin | Updated: October 11, 2014 01:51 IST

निवडणुका म्हटले की मोठ्या प्रमाणात पैशाची उधळण होते. कोट्यवधीच्या घरात पैसे खर्च करून निवडणूक विभागाला अत्यल्प खर्च दाखविणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी नाही.

नरेश रहिले गोंदियानिवडणुका म्हटले की मोठ्या प्रमाणात पैशाची उधळण होते. कोट्यवधीच्या घरात पैसे खर्च करून निवडणूक विभागाला अत्यल्प खर्च दाखविणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी नाही. परंतु विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या ११ उमेदवारांनी अद्याप एक कवडीही खर्च केलेला नाही! आश्चर्यात टाकणाऱ्या या उमेदवारांमध्ये गोंदिया मतदार संघातील ४ व तिरोडा मतदार संघातील ७ उमेदवार आहेत.गोंदिया विधानसभा क्षेत्रातील छैलबिहारी अग्रवाल, धर्मेंद्र गजभिये, दिगंबर पाचे व अभियंता राजीव ठकरेले यांनी अद्याप एक कवडीचाही खर्च केलेला नाही. तिरोडा विधानसभा क्षेत्रातील अ.कदीर शेख, प्रताप पटले, अविनाश नेवारे, राजकुमार बोहने, मनोहर पटले, श्रावण रहांगडाले, सुरेश टेंभरे यांनीसुद्धा कोणताही खर्च केलेला नाही. अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे उमेदवार किरण कांबळे यांनी २ लाख १४ हजार ४४४, काँग्रेसचे राजेश नंदागवळी यांनी १ लाख १४ हजार ८९०, भाजपचे राजकुमार बडोले यांनी २ लाख ८५ हजार ६३०, राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रीकापुरे ४ लाख ७८ हजार १३१, बसपाचे भिमराव मेश्राम यांनी १ लाख ८२ हजार ७८७, भारिपचे धनपाल रामटेके यांनी १२ हजार ५३०, अपक्ष उमेदवार अजय लांजेवार यांनी १ लाख ४१ हजार ८७८, प्रमोद गजभिये यांनी ३६ हजार ५३०, बरसूजी गडपाल यांनी ५ हजार ३०, रत्नदीप दहिवले यांनी ७२ हजार ७३०, दिलवर्त रामटेके यांनी ४७ हजार ४९३, दिलीप वालदे यांनी २४ हजार ५३० तर महेश शेंडे यांनी ५ हजार ३० रुपये खर्च केले आहेत. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी १ लाख ७८ हजार ८८०, भाजपचे विनोद अग्रवाल २ लाख ९१ हजार ६५७, राष्ट्रवादीचे अशोक गुप्ता यांनी ३ लाख ९ हजार २८७, कॉम्युनिस्ट पक्षाच्या करुणा गणवीर यांनी ३ लाख ४९ हजार ३९ रुपये, शिवसेनेचे राजकुमार कुथे यांनी १ लाख ६५ हजार ५६६, बसपाचे योगेश बन्सोड यांनी १९ हजार ८७० रुपये, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे गोपाल उईके यांनी ६ हजार ३७५, आंबेडकर राईट पार्टी आॅफ इंडियाचे उमेदवार विनोदकुमार नंदुरकर यांनी ८४ हजार ७६० रुपये, अपक्ष उमेदवार चिंधू उके यांनी १३ हजार १७५, संतोष उमरे यांनी ४६ हजार ९५०, सुरेश चौरागडे यांनी १ लाख ७४ हजार ९२ रुपये, नारायण पटले यांनी १४ हजार ३३९ रुपये, नामदेव बोरकर यांनी १३ हजार ९२०, लक्ष्मण मेश्राम ६७ हजार १०१, मंगल मस्करे यांनी १० हजार २४० रुपये खर्च केले आहेत. तिरोडा विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे परसराम कटरे यांनी १ लाख ३७ हजार ८१८ रुपये, राष्ट्रवादीच्या राजलक्ष्मी तुरकर यांनी ४ लाख ५२ हजार ५१५, शिवसेनेचे पंचम बिसेन यांनी ८५ हजार ३१० रुपये, भाजपचे विजय रहांगडाले यांनी ४ लाख १० हजार ३६२, बसपाचे दिपक हिरापूरे यांनी ४१ हजार ५१५ रुपये, पिझन्ट्स अ‍ॅन्ड वर्कर्स पार्टी आॅफ इंडियाचे विरेंद्र जायस्वाल यांनी ९० हजार रुपये, अपक्ष उमेदवार दिलीप बन्सोड यांनी १ लाख ७ हजार ८२१ रुपये खर्च केले आहेत.आमगाव विधासभा क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार रामरतनबापू राऊत यांनी २ लाख ३० हजार १४० रुपये, राष्ट्रवादीचे रमेश ताराम यांनी २६ हजार ५४१, भाजपचे संजय पुराम २ लाख ४९ हजार २९१ रुपये, शिवसेनेचे मुलचंद गावराने यांनी १ लाख ५ हजार ८७६, शारदा उईके यांनी ९३ हजार ५०, सहेसराम कोरोटे यांनी १ लाख २३ हजार १५३, केशव भोयर यांनी ५ हजार २०० रुपये तर संतोष नहाके यांनी ६ हजार १६५ रुपये खर्च केले आहे.