शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

१०८ पोलिसांना विशेष सेवा पदक वितरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 21:17 IST

गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात सतत २ वर्ष उत्कृष्ट सेवा करणाऱ्या १०८ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून खडतर सेवेचे पदक देवून सन्मानित करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.७) ग्राम कारंजा येथील पोलीस मुख्यालयात हा पदक वितरण सोहळा घेण्यात आला.

ठळक मुद्दे३१ अधिकारी व ७७ पोलीस कर्मचाऱ्यांचा बदलीच्या ठिकाणीच सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात सतत २ वर्ष उत्कृष्ट सेवा करणाऱ्या १०८ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून खडतर सेवेचे पदक देवून सन्मानित करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.७) ग्राम कारंजा येथील पोलीस मुख्यालयात हा पदक वितरण सोहळा घेण्यात आला. विशेष म्हणजे, ज्यांना हे पदक जाहीर झाले आणि त्यांची ज्या ठिकाणी नियुक्ती आहे त्याच ठिकाणी हे पदक देवून सन्मानीत करण्यात आले.कार्यक्रमाला नागपूर शहरचे सह पोलीस आयुक्त रविंद्र कदम, नक्षल विरोधी अभियान नागपूरचे शरद शेलार, गडचिरोली परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, गोंदिया जिल्ह्याचे पहिले पोलीस अधिक्षक टी.बी. देवतळे, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक हरिष बैजल, आमगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोज जिंदल, बिरसी विमानतळचे सचिन खंगार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप आटोळे उपस्थित होते.गोंदिया जिल्ह्यात काम करणाऱ्या पोलिसांना त्यांच्या कामाची पावती मिळावी म्हणून गोंदिया पोलिस विभागाने दोन वर्षापूर्वी पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांची माहिती व प्रस्ताव मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयाला पाठविला होता. त्यानुसार, शासनाने गोंदिया जिल्ह्यात कार्य करणाऱ्या ३१ अधिकारी व ७७ पोलीस कर्मचाऱ्यांना खडतर सेवेचा पुरस्कार जाहीर केला.यातील एक सहायक पोलीस निरीक्षक व ५७ पोलीस कर्मचारी सध्या गोंदिया जिल्ह्यात कार्यरत आहेत. तर ५० अधिकारी-कर्मचारी बदलून गेले आहेत. बदली झाल्यानंतर ज्या ठिकाणी ते अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. त्या ठिकाणी पोलीस परेडमध्ये सदर पदक त्यांना देवून सन्मानीत करण्यात आले. या पदकासाठी गोंदिया जिल्ह्यात सेवा दिलेले सात पोलीस निरीक्षक, ६ सहायक पोलीस निरीक्षक, १८ पोलीस उपनिरीक्षक व ७७ कर्मचारी अशा १०८ लोकांची निवड करण्यात आली. राज्यात गोंदिया व गडचिरोली सोडून काम करणाºया पोलीस अधिकाऱ्यांना या दोन जिल्ह्यात काम करण्याची प्रेरणा मिळावी म्हणृून शासनाने खडतर सेवेचे पदक देण्यात आले आहे.यांंचा झाला सन्मानकठीण व खडतर कामगिरी केल्याबद्दल विशेष सेवा पदक गोंदिया जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेले डुग्गीपार पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, दिलीप हातझाडे (बक्कल क्र.१७६६), अशोक टिचकुले (११९०), शितल भांडारकर (२०७५), आशा बोरकर (१६८३), सुषमा कनपुरीया (७७६), काजल पंच (८३३), पुरूषोत्तम देशमुख (१८५४), राजेंद्र चकोले (१८७०), दिलीप बंजार (१७१८), प्रशांत कुरंजेकर (१७३२), प्रकाश मेश्राम (१६०४), अर्जुन सांगळे (१५७६), मनोज केवट (१९२१), गंगाधर केंदे्र (१६३०), श्रीकांत नागपुरे (१९४६), राकेश भुरे (१४२७), रूपेंद्र गौतम (१९३८), शिवलाल उईके (१८८९), प्रसन्ना सुखदेवे (१६८२), नितेश गवई (१७८३), देवेंद्र कोरे (१९४०), चंद्रमणी खोब्रागडे (२४८), सुरेश बावणकर (१५१४), अनिल उके (२००१), बिंदीया कोटांगले (१६६९), गौतम भैसारे (२००३), संतोष चुटे (२०१०), पुरूषोत्तम बोपचे (२१११), कैलाश यादव (९४०), ममता दसरे (१४६७), प्रतापसहा सलामे (८५५), किशोर टेंभूर्णे (७६६), लक्ष्मण गोटे (२०९७), चुळीराम शेंडे (१७४६), शालीकराम दखने (१५९१), बाबुलाल राऊत (२४७), सुरेश कटरे (२११६), ओमप्रकाश जामनिक (१११४), यादोराव कुर्वे (२११०), सुनिल गुट्टे (२१२०), हंसराज अरकासे (१५६०), अमित लांडगे (१३८९), रामेश्वर राऊत (१२४४), आशिष वंजारी (२०६२), ईश्वरदास जनबंधू (१९०२), मनोज चुटे (१५०२), विलास नेरकर (१७११), हितेश बरिये (१४१४), संदीप झिले (५२१), लियोनार्ड मार्र्टींन (२७२), महेंद्र मेश्राम (४०२), घनश्याम उईके (१३९७), सेवक राऊत (१३६२), राजेंद्र बिसेन (१२४६), नितीन रहांगडाले (१११९), योगेश गावंडे (२०८३), अमित नागदेवे (१८९२) यांना पदक देऊन सन्मानीत करण्यात आले आहे.

टॅग्स :Policeपोलिस