शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

१०२७ तरुणांनी थाटला स्वयंरोजगार

By admin | Updated: July 18, 2014 00:08 IST

शासनाकडून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम सन २००८ पासून राबविण्यात येत आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे विविध योजना या कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येतात.

रोजगार निर्मिती कार्यक्रम : सरकारी अनुदानगोंदिया : शासनाकडून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम सन २००८ पासून राबविण्यात येत आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे विविध योजना या कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येतात. खादी आणि ग्रामोद्योग आयोग, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत १ हजार २७ तरुणांना स्वयंरोजगार प्राप्त झाला आहे. या योजनेअंतर्गत शासनाव्दारे वर्ष २०११-१२ मध्ये ८० लाभार्थ्यांना उद्योगाकरिता १ कोटी ५६ लाख रुपये, वर्ष २०१२-१३ मध्ये ५४ लाभार्थ्यांना ८६ लाख ५५ हजार रुपये आणि वर्ष २०१३-१४ मधील १८ लाभार्थ्यांना ७२ लाख ५३ हजार रुपये कर्ज प्रदान करण्यात आले आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत खनिज संपत्तीवर आधारित उद्योग, वनसंपत्तीवर आधारित उद्योग, कृषि व अन्न प्रक्रिया उद्योग, पॉलीमर व रसायनांवर आधारित उद्योग, ग्रामीण अभियांत्रिकी तसेच अपांरपारिक उर्जेवर आधारित उद्योग व सेवा उद्योगांचे प्रशिक्षण दिले जाते. या योजनेअंतर्गत वर्ष २०११-१२ मध्ये विविध उद्योगांचे ३ वर्षामध्ये ४४४ तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले. वर्ष २०१२-१३ मध्ये ३४८ तरुणाना आणि वर्ष २०१३-१४ मध्ये २३५ तरुणांना ३ वर्षामध्ये अशा एकूण १ हजार २७ तरुणांना प्रशिक्षणातून स्वयंरोजगार प्राप्त झाला आहे. वर्ष २०१३-१४ मध्ये राखेपासून तयार करण्यात येणाऱ्या विटांच्या निर्मिती उद्योगावर भर देण्यात आला आहे. यावर्षी जिल्ह्यात या उद्योगाचे ६ युनिट सुरू करण्यात आले असून या उद्योगात जिल्ह्यातील ६ उद्योजकांनी १ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून दर दिवशी ४५ हजार विटा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. या उद्योगातील ६ युनिटमध्ये १०० ते १५० गरजूंना रोजगारही उपलब्ध झाला आहे. या योजनेचे अंतर्गत सर्वसाधारण संवर्गातील लाभार्थी प्रकल्प किंमतीच्या १० टक्के तर ९० टक्के बँक कर्ज तर राखेव संवर्गातील लाभार्थ्यांना स्वगुंतवणूक प्रकल्प किमतीच्या ५ टक्के तर ९५ टक्के बँक कर्ज प्रदान केले जातात. या योजनेचा लाभ घेतलेल्या उद्योजकांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी याकरिता आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच राज्य व जिल्हास्तरावर प्रदर्शनाच्या माध्यमातून उद्योजकांच्या निर्मित वस्तूंना व मालाला प्रसिध्दी देण्यात येते, असे जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक भारती यांनी सांगितले. या योजनेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी क्षेत्रातील गरजू व सुशिक्षीत बेरोजगाराांं स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली. बेरोजगार युवकांचे स्थलांतरणही थांबले तरूणांसाठी भरीव प्रमाणात रोजगार निर्मितीची दारे खुले झाली आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)