शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

रोजगार हमी योजनेची १०० टक्के कामे सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:12 IST

शासनाच्या सर्वांच्या हाताला काम या धोरणाअंतर्गत तालुक्यातही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (एमआरईजीएस) जवळपास सर्वच गावात कामे सुरु झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देनवेगाव (खु) मध्ये १५० रुपये रोजी : मजुरीसाठी लागतो १०० रुपये हप्ता

आॅनलाईन लोकमततिरोडा : शासनाच्या सर्वांच्या हाताला काम या धोरणाअंतर्गत तालुक्यातही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (एमआरईजीएस) जवळपास सर्वच गावात कामे सुरु झाल्याची माहिती आहे. परंतु त्यात अनेक गावातील मजुरांना १५० ते १६० मजूरी दररोजची मिळविण्यासाठी १०० रुपये हप्ता सदर कामावर नियुक्त रोजगार सेवक किंवा एखाद्या विश्वासपात्र हस्तकाद्वारे ही रक्कम कनिष्ठ अभियंता वसूल करतो अशी ओरड तालुक्यात मागील वर्षापासून सुरु आहे.तालुक्यातील नवेगाव (खु.) येथील माहिती घेतली असता नाव न सांगण्याच्या अटीवर सदर बाब सत्य असल्याची माहिती मिळाली. नवेगाव (खु.) मध्ये तुमसर रोडच्या जवळच्या मोहबागेतून एलोरा रेल्वेगेटच्या पांदणरस्त्याचे काम सुरु आहे. सदर कामावर २८९ मजूर असून त्यांना मिळत असलेल्या रोजीनुसार काम प्रत्यक्षात होत नाही. परंतु चिरिमिरी देऊन १०० रुपये हप्त्याप्रमाणे मजुरांची रोजी १४० ते १५० रुपये रोज काढली जाते आहे असल्याची माहिती आहे.शासनाने ठरवून दिलेले सरासरी शासन दर २०१ रुपये प्रति दिवस आहे. परंतु ही निश्चित रोजी वृक्षलागवड, कंपाऊंड, नाल्यावरील काम, झाडे कापने अशा बाबींसाठी आहे. माती खोदकामात नियमित दर लागू नाही. आजच्या यंत्रयुगात व भेसळयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे मनुष्याची काम करण्याची क्षमता फारच कमी झालेली आहे. परंतु शासनाचे निकष जुनेच आहेत. त्यामुळे मजूरवर्ग स्वत:ची रोजी वाढविण्यासाठी १०० रुपये हप्ता देत असल्याची माहिती आहे.कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती सुद्धा कंत्राटी स्वरुपाची असल्यामुळे त्यांनाही हप्ता बाबीचे फारशे गांभीर्य नाही. कारणही तसेच आहे. १५००० ते २०,००० रुपये पगारावर काम करते असल्याने एका अभियंत्याला आजच्या युगात तरी परवडण्यासारखे नाही. ही बाब सुद्धा शासनाने दखल घेण्यासारखी आहे. यात दोषी कोणाला ठरवावे हा सुद्धा प्रश्नच आहे. मजूर वर्गाला चिरिमिरी देता का असे विचारले असता कोणीही पुढे येऊन सांगायला तयार नाही. मोजमापानुसार रोजी काढली असता ३० ते ३४ रुपये रोजी मिळेल. यात आमचेच नुकसान होणार, त्यामुळे दबक्या आवाजात पैसे दिल्याचे मजूर सांगतात. हा प्रकार संपूर्ण तालुक्यातच सुरू असल्याचेही बोलले जात आहे.अनेक लोकप्रतिनिधी व लोकांचे मला फोन आले त्यात मजुरांकडून हप्ता वसूली होत आहे. अशी तक्रार मिळाली. त्यानंतर मी स्वत: कामावर जावून मोजमाप केली असता प्रत्यक्षात मजुरांचे त्यांना मिळत असलेल्या रोजीप्रमाणे काम होत नाही. परंतु मजुरांना योग्य रोजी मिळत असल्याने व कोणीही तक्रार केली नसल्याने कार्यवाही करता येत नाही.एल.डी. चव्हाणसहाय्यक कार्यक्रम अधिकारी एपीओगावात सुरु असलेल्या एमआरईजीएस च्या कामात मजूर पैसे देतात किंवा नाही याबाबद नक्की माहिती नाही. परंतु चर्चा आहे.मिनल अनिल पटलेसरपंच नवेगाव खुर्द.