शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

१० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनास मुकणार

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

यावर्षी असलेले पावसाचे कमी प्रमाण आणि खरीप हंगामात पिकांसाठी सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे रबी (उन्हाळी) हंगामातील पाण्याचे नियोजन पार कोलमडून गेले आहे.

उन्हाळी हंगाम कुचकामी : इटियाडोह प्रकल्पात ठणठणाटमनोज ताजने गोंदियायावर्षी असलेले पावसाचे कमी प्रमाण आणि खरीप हंगामात पिकांसाठी सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे रबी (उन्हाळी) हंगामातील पाण्याचे नियोजन पार कोलमडून गेले आहे. इटियाडोह प्रकल्पात अवघा ६३.२१ दलघमी (१९.८२ टक्के) जलसाठा असल्यामुळे या प्रकल्पातून यावर्षी एक हेक्टर क्षेत्रालाही पाणी देण्याचे नियोजन बाघ-इटियाडोह विभागाने केलेले नाही. गेल्या अनेक वर्षात प्रथमच अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे उन्हाळी धानासह इतर पिकांपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे.जिल्ह्यात उन्हाळी हंगामात सर्वाधिक सिंचन इडियाडोह प्रकल्पावरच होते. गेल्यावर्षी या प्रकल्पाच्या पाण्यातून तब्बल ९९०० हेक्टर क्षेत्राला सिंचन झाले होते. पण यावर्षी इटियाडोह प्रकल्पातून पाणी वाटपाचे नियोजनच नसल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पिकापासून वंचित राहावे लागणार आहे. या प्रकल्पाचे पाणी घेणाऱ्या ५५ पाणी वाटप संस्थांनीही जलसाठ्याची स्थिती पाहता पाणी घेण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे प्रकल्प कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे यावर्षी जवळपास १० हजार हेक्टर क्षेत्राला उन्हाळी हंगामात सिंचनापासून वंचित राहावे लागणार आहे.नियोजन कोणामुळे बिघडले?यावर्षी मोठ्या प्रकल्पांपैकी इटियाडोह प्रकल्पात असलेला ६३.२१ दशलक्ष घटनमीटर जलसाठ्यापैकी ३.०७२ दलघमी पाणी पिण्यासाठी म्हणून राखीव ठेवावे लागते. काही जलसाठा बाष्पीभवन होऊन कमी होतो. उर्वरित जलसाठ्यातून काही प्रमाणात सिंचन होऊ शकते. पण त्यासाठी पुढाकार घेण्यास पाणी वापर संस्था इच्छुक नाही, की इटियाडोह प्रकल्पाचे व्यवस्थापन, याबाबत काही लोक ‘आॅफ द रेकॉर्ड’ वेगवेगळी चर्चा करीत आहेत. कालव्यांच्या दुरूस्तीची कामे करता यावीत यासाठी खरीप हंगामात जास्तीचे पाणी सोडून रबी हंगामात शेतीला पाण्यापासून वंचित ठेवल्या जात आल्याचा आरोप काही शेतकरी करीत आहेत. त्यामुळे हे नियोजन बिघडले की मुद्दाम बिघडविले, हे चर्चेचा विषय झाला आहे.पुराम यांच्यासाठी थांबले आमगाव-सालेकसाचे नियोजनबाघ प्रकल्पाच्या पाण्याचे गोंदिया, आमगाव व सालेकसा तालुक्यात वाटप करण्याच्या नियोजनासाठी गुरूवारी बाघ-इटियाडोह प्रकल्पाच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. संबंधित तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार हे बाघ कालवे सल्लागार समितीचे अध्यक्ष असल्यामुळे गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल हे बैठकीला हजर होते. त्यांनी गोंदिया तालुक्यातील पाणी वाटपाचे नियोजन करवून घेतले. मात्र आमदार संजय पुराम हे हजर नसल्यामुळे आमगाव-सालेकसा तालुक्यात कोणत्या संस्थेला किती पाणी द्यायचे याचे नियोजन होऊ शकले नाही.बाघ प्रकल्पातून ११८० हेक्टरचे नियोजनजिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी कालीसरार प्रकल्पात जलसाठा निरंक आहे. त्यामुळे आता केवळ शिरपूर आणि पुजारीटोला धरणावरच रबी हंगामाचे नियोजन अवलंबून आहे. त्यापैकी बाघ प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शिरपूरमध्ये ७१.८२ दलघमी तर पुजारीटोलात २५.६२ दलघमी जलसाठा आहे.बाघ प्रकल्पातून करावयाच्या ११८० हेक्टर सिंचनापैकी गोंदिया तालुक्यातील ५९० हेक्टर, आमगाव तालुक्यातील ३५४ हेक्टर तर सालेकसा तालुक्यातील २३६ हेक्टर क्षेत्राला हे पाणी मिळणार आहे.गेल्यावर्षी बाघ आणि इडियाडोह या दोन्ही प्रकल्पांमधून जवळपास १२ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचन झाले होते. मात्र १२०० हे. होईल.