लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन दिवसात एकही नवीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली नसून कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागल्याचे दिलासादायक चित्र आहे. गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एकूण ३३ कोरोना बाधितांपैकी एक कोरोना बाधित रविवारी (दि.२१) कोरोनामुक्त झाला. त्यामुळे जिल्ह्यात आता ३२ कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण असून जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.दोनदा पूर्णपणे कोरोनामुक्त झालेल्या गोंदिया जिल्ह्यात बाहेरील राज्य आणि विदेशातून आलेल्या नागरिकांमुळे १२ जून रोजी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. आठ दिवसांच्या कालावधीतच जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ३३ वर पोहचला होता. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये थोडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता अजूनही काही भागात लॉकडाऊन असल्याने रोजगारासाठी विविध राज्य आणि विदेशात गेलेले नागरिक आता आपल्या स्वगृही परतू लागले आहे. दुबई आणि दिल्लीहून आलेल्या तिरोडा तालुक्यातील नागरिकांमुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. सुदैवाने बाहेरुन आलेल्या या सर्व नागरिकांना गोंदिया येथील एका लॉनमध्ये क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा गावाशी संपर्क आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क न आल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत झाली. विशेष मागील तीन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात नवीन कोराना बाधिताची नोंद झाली नाही. तर ३३ अॅक्टीव्ह कोरोना रुग्णांपैकी रविवारी (दि.२१) एक जण कोरोनामुक्त झाल्याने आता जिल्ह्यात ३२ कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत एकूण १८१४ रूग्णांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १०२ स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून १६२७ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर ८५ नमुन्याचा अहवाल येथील शासकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त व्हायचा आहे.
३३ पैकी १ कोरोना बाधित झाला कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:01 IST
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता अजूनही काही भागात लॉकडाऊन असल्याने रोजगारासाठी विविध राज्य आणि विदेशात गेलेले नागरिक आता आपल्या स्वगृही परतू लागले आहे. दुबई आणि दिल्लीहून आलेल्या तिरोडा तालुक्यातील नागरिकांमुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. सुदैवाने बाहेरुन आलेल्या या सर्व नागरिकांना गोंदिया येथील एका लॉनमध्ये क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा गावाशी संपर्क आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क न आल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत झाली.
३३ पैकी १ कोरोना बाधित झाला कोरोनामुक्त
ठळक मुद्देजिल्ह्यात आता ३२ कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण : ८५ स्वॅब नमुन्याचा अहवाल अप्राप्त'