शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गोर्रे येथील संस्थेचा 1 कोटी 75 लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2022 21:48 IST

आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित गोरे यांचे संचालक व्यवस्थापक मंडळ ग्रेडर यांनी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किमती खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेला एकूण धानसाठा खरीप हंगाम १४५८०.४० तसेच रब्बी हंगाम ३१०१५.४० क्विंटल २०१९-२० मधील धान खरेदीच्या वेळी संस्थेने असे एकूण ४५५९५.८० क्विंटल खरेदी केले होते. त्यापैकी ३६८३२ क्विंटल धानाचा पुरवठा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील धान खरेदीचे एका मागून एक घोटाळे पुढे येत असून शनिवारी (दि.१५) आदिवासी महामंडळाने सालेकसा तालुक्यातील गोर्रे येथील आदिवासी धान खरेदी संस्थेच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार केल्याचे माहीत होताच संस्थेचे अध्यक्ष व इतर संचालक आधीच फरार झाले आहेत. त्यांचा शोध सालेकसा पोलिसांनी सुरू केला आहे. आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित गोर्रे येथील अध्यक्ष व इतर संचालक मंडळ व्यवस्थापक ग्रेडर यांनी संगनमताने महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक शासनाचे धानाचे अपहार केल्याचे विभागाने केलेल्या चौकशीत पुढे आले. याप्रकरणी सहकारी संस्था गोर्रे येथील अध्यक्ष संतोष सदनलाल मडावी रा. मरकाखांदा व इतर संचालक शिवाजी कोसमे रा. सीतेपाला, अरुण मनमोनी फुंडे, सिंधीटोला, जयलाल पटले, गोरे, हिरामण जिंदाफोर,  सीतेपाला, झाडू गावड-जोशीटोला, खोदूलाल टेकाम, शिकारीटोला, रामजी सिरसाम, मानागड, अनिल फुंडे सिंधीटोला, मुन्जा इंगळे, चेतन जुगनाखे, गजानन मरस्कोल्हे, उपप्रादेशिक व्यवस्थापक आशिष मुळेवार  या सर्वांनी संगनमत करून सालेकसा तालुक्यामध्ये धान खरेदी करण्याकरिता आलेल्या नियुक्तीनंतर करारनाम्यातील नियमांचे उल्लघंन करून धानाचा अपहार केला. तसेच शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर महामंडळाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. 

 ८०१३ क्विंटल धानाचा केला अपहार आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित गोरे यांचे संचालक व्यवस्थापक मंडळ ग्रेडर यांनी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किमती खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेला एकूण धानसाठा खरीप हंगाम १४५८०.४० तसेच रब्बी हंगाम ३१०१५.४० क्विंटल २०१९-२० मधील धान खरेदीच्या वेळी संस्थेने असे एकूण ४५५९५.८० क्विंटल खरेदी केले होते. त्यापैकी ३६८३२ क्विंटल धानाचा पुरवठा करण्यात आला. तर ८७६३.४७ शिल्लक असणे गरजेचे होते. परंतु केलेल्या तपासणीत गोदामामध्ये अंदाजे केवळ १५० क्विंटल शिल्लक असल्याचे आढळले. यावरून ८६१३.४७ क्विंटल किंमत अंदाजे १ काेटी ७७ लाख ३७ हजार ९३८.८० रुपयांच्या धानाचे संगनमताने अपहार करून करून शासनाची फसवणूक केली. संस्थेचे अध्यक्ष व इतर संचालक मंडळ व्यवस्थापक ग्रेड यामध्ये संतोष मडावी व इतर १३ जणांविरुद्ध पोलीस स्टेशन सालेकसा येथे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड