शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात निवडणूक आचारसंहिता लागू, जिल्हा पंचायत निवडणूक 22 मार्चला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 17:07 IST

श्रीवास्तव यांनी मेल्वीन वाझ, गुरुदास देसाई, सागर गुरव यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली.

पणजी : राज्यात येत्या 22 मार्च रोजी जिल्हा पंचायत निवडणूक होईल व त्यासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास येत्या 27 रोजी आरंभ होईल. राज्यभर जिल्हा पंचायत निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली. ही घोषणा राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी येथे केली.

श्रीवास्तव यांनी मेल्वीन वाझ, गुरुदास देसाई, सागर गुरव यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. जिल्हा पंचायत निवडणुका  जरी पालिका व महापालिका क्षेत्रत होत नसल्या तरी, निवडणूक आचारसंहिता मात्र पूर्ण राज्यात लागू झाली आहे, असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास दि. 5 मार्च ही शेवटची मुदत आहे. सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. एकूण पंधरा निर्वाचन अधिका-यांची नियुक्ती आयोगाने केली आहे. 22 रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. 

दुस-याच दिवशी म्हणजे 23 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला आरंभ होईल. एकूण नऊ हजार कर्मचारी व पोलीस निवडणूक कामाशीसंबंधित प्रक्रियेत सहभागी होतील. एकूण 1 हजार 237 मतदान केंद्रे आहेत.

एकूण 8 लाख 29 हजार मतदार उत्तर गोव्यात पंचवीस व दक्षिण गोव्यात पंचवीस मिळून एकूण पन्नास  जिल्हा पंचायत मतदारसंघात निवडणुका होतील. एकूण मतदारसंख्या 8 लाख 29 हजार 876 आहे. जिल्हा पंचायत मतदारसंघात सरासरी 16 हजार 6क्क् मतदार आहेत. मात्र उत्तर गोव्यात सर्वात कमी मतदार हे पाळी मतदारसंघात (14 हजार 196) आहेत. उत्तरेत सुकूर मतदारसंघात सर्वात जास्ती म्हणजे 22 हजार 505 मतदार आहेत. 

दक्षिण गोव्यात सर्वात जास्त मतदार सांकवाळ मतदारसंघात (23 हजार 286) आहेत. तिथे सर्वात कमी मतदार उसगाव गांजे मतदारसंघात (11 हजार 344) आहेत. निवडणुका पक्षीय पातळीवर होतील. उमेदवारांना पाच लाख रुपयांची खर्च मर्यादा आहे.सरकारने एकूण पन्नास मतदारसंघांपैकी 31 मतदारसंघ विविध घटकांसाठी आरक्षित केले आहेत.

सर्वसाधारण वर्गातील उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरताना निर्वाचन अधिका-याकडे पाचशे रुपयांची अनामत रक्कम ठेव म्हणून सादर करावी लागेल. महिला व अन्य आरक्षित उमेदवाराला तीनशे रुपयांची रक्कम सादर करावी लागेल. 

टॅग्स :goaगोवा