शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

स्मृतिभृंशाने त्रस्त वृद्धांसाठी निवारा केंद्रे  उभारण्याच्या योजनेला गोव्यात शून्य प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 20:27 IST

स्मृतिभृंशाचा आजार जडलेल्या वृद्धांसाठी निवारा केंद्रे उभारण्याच्या सरकारच्या योजनेला गोव्यात बिगर शासकीय संघटनांकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. राज्यात स्मृतिभृंशाने त्रस्त असंख्य वृद्ध असूनही याबाबतीत कुठलीही संघटना पुढे आलेली नाही.

पणजी : स्मृतिभृंशाचा आजार जडलेल्या वृद्धांसाठी निवारा केंद्रे उभारण्याच्या सरकारच्या योजनेला गोव्यात बिगर शासकीय संघटनांकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. राज्यात स्मृतिभृंशाने त्रस्त असंख्य वृद्ध असूनही याबाबतीत कुठलीही संघटना पुढे आलेली नाही.समाजकल्याणमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी याबाबत खेद व्यक्त करताना या केंद्रीय योजनेसाठी एकाही संघटनेने अद्याप अर्ज केलेला नाही, असे सांगितले. ते म्हणाले की, ‘बिगर शासकीय संघटनांना या कामासाठी आवश्यक ती आर्थिक मदत देण्याची सरकारची तयारी आहे. ही केंद्रीय योजना आहे आणि इतर राज्यांमध्ये संघटनांनी निवारा केंद्रे उभारण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. गोव्यात राज्य सरकारच्याही अनेक योजना आहेत परंतु अवघ्याच बिगर शासकीय संघटना कार्यरत असल्याने तसेच त्यांना या कामात रस नसल्याने या संघटना पुढाकार घेत नाहीत. कोणत्याही संघटनेने अर्ज केल्यास 15  दिवसांच्या आत तो निकालात काढण्याची सरकारची तयारी आहे.’

वरील योजनेंतर्गत बिगर शासकीय संघटनांनी जागा शोधावी, कर्मचारीवर्ग घ्यावा, परिचारिका नेमाव्यात, असे नमूद करुन मडकईकर म्हणाले की, निवारा केंद्रे बांधण्यासाठीही निधी देण्याची तरतूद आहे. राज्यात वृद्धाश्रम आहेत. परंतु स्मृतिभृंशाचा आजार जडलेल्यांची देखभाल, शुश्रुषा करण्यासाठी विशेष असे एकही निवारा केंद्र नाही. गोव्यात स्मृतिभृंश रुग्णांसाठी काम करणा-या एका संघटनेच्या दाव्यानुसार राज्यात सुमारे ५ हजार असे त्रस्त रुग्ण आहेत. गोवा आणि केरळमध्ये वृद्धांचे प्रमाण जास्त आहे. २0११ च्या जनगणनेनुसार गोव्यात एकूण लोकसंख्येच्या ११.२ टक्के लोक ६0 वर्षे वयावरील होते तर केरळमध्ये हा आकडा १२.३ टक्के इतका आहे.गोव्यात काँग्रेस सरकार सत्तेवर असताना अशा रुग्णांसाठी खास केंद्रे उघडण्याची घोषणा केली होती परंतु प्रत्यक्षात काहीच झाले नाही. ज्या कुटुंबात अशा व्यक्ती आहेत त्यांना हाताळण्यासाठी कुटुंबातील अन्य व्यक्तींनाही प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

काही वर्षांपूर्वी डिमेंशिया सोसायटी आॅफ गोवा या संघटनेची गोमेकॉच्या न्युरो सर्जरी विभागाच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली स्थापना झाली. डॉ. अमित डायस यांनी केलेल्या अभ्यासानुसार ६0 पेक्षा अधिक वय असलेल्या २.९ टक्के तर ८0 पेक्षा जास्त वय असलेल्या १२.५ टक्के वृद्धांना स्मृतिभृंशानं ग्रासले आहे. देशभरात ४0 लाख वृद्ध या आजाराने त्रस्त आहेत आणि आपल्या बाबतीत काय घडते आहे हे त्यांना माहीतदेखील नाही.

टॅग्स :goaगोवा