Wrong depiction of women in Goa through the website | वेबसाईटद्वारे गोव्यातील महिलांचे चुकीचे चित्रण
वेबसाईटद्वारे गोव्यातील महिलांचे चुकीचे चित्रण

वास्को : गोव्यातील महिला व तरुण मुलींना फसवून त्यांच्याशी कशा प्रकारे लैंगिक संबंध प्रस्थापित करावेत, गोव्यातील कोणत्या जागेवर कशा मुलींशी कसा संपर्क साधता येईल, यासंबंधीची माहिती ‘हूकअप ट्रॅव्हल्स डॉट कॉम’ नावाच्या वेबसाईटवर झळकल्यानंतर गोव्यात खळबळ उडाली आहे.

मानवी तस्करी, शरीरविक्रयच्या व्यवसायात ओढल्या जाणाऱ्या पीडित महिलांसाठी काम करणाºया ‘अर्ज’ (अन्यायरहित जिंदगी) या स्वयंसेवी संस्थेने या वेबसाईटविषयी चिंता व्यक्त केली आहे. या वेबसाईटद्वारे गोव्यातील मुली-महिलांचे चुकीचे चित्रण जगभर जात असल्याने गोवा सरकारने तातडीने त्याची दखल घेऊ न, वेबसाईटवर बंदी घालण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी ‘अर्ज’चे अरुण पांडे यांनी केली आहे. मंदिरे, चर्च आणि समुद्रकिनाऱ्यांसाठी गोवा प्रसिद्ध आहे आणि जगभरातील पर्यटक त्याच ओढीने गोव्यात येतात. मात्र, गोव्याचे नाव या वेबसाईटद्वारे बदनाम करण्यात येत आहे. पर्यटन व्यवसायासाठी ते धोकादायक असल्याचे ते म्हणाले.

असुरक्षित वातावरण
या वेबसाईटद्वारे विशिष्ट प्रकारचे पर्यटक गोव्यात आकर्षित करण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहे. गोव्यातील किनारी भागात सध्याच मुलींसाठी असुरक्षित वातावरण आहे. अशा वेबसाईटमुळे महिला व तरुण मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला कोण जबाबदार, असा सवालही पांडे यांनी केला.


Web Title: Wrong depiction of women in Goa through the website
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.