शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या माजी आमदारांना कार्यकर्त्यांनी जागा दाखवली : तेंडुलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 20:05 IST

भाजपाचे काही माजी आमदार भाजपच्या कार्यकर्त्यांशी योग्य प्रकारे वागले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अशा आमदारांना गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून दिली, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पक्षातील काही असंतुष्टांचा बुधवारी समाचार घेतला.

पणजी : भाजपाचे काही माजी आमदार भाजपच्या कार्यकर्त्यांशी योग्य प्रकारे वागले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अशा आमदारांना गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून दिली, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पक्षातील काही असंतुष्टांचा बुधवारी समाचार घेतला. पक्षाच्या येथील कार्यालयात भाजपाच्या कोअर टीमची बुधवारी सायंकाळी बैठक झाली. ती बैठक प्रचंड वादळी ठरली.बैठकीनंतर पत्रकारांनी लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या टीकेविषयी तेंडुलकर यांना विचारले. दयानंद सोपटे किंवा सुभाष शिरोडकर यांना पक्षात घेताना पार्सेकर वगैरेंना विचारले नाही अशी टीका होत आहे. तसेच गेल्या निवडणुकीच्या पराभवाचे खापर आपल्यावर अकारण फोडले गेले, असे पार्सेकर म्हणत असल्याविषयी काय वाटते. असे तेंडुलकर यांना विचारताच तेंडुलकर म्हणाले, की आम्हाला भाजप बळकट करायचा आहे. सोपटे व शिरोडकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे आम्ही मांद्रे व शिरोडा हे दोन्ही मतदारसंघ निश्चितच जिंकणार आहोत. सोपटे यांना भाजपाचा यापूर्वीचा अनुभव आहे. ते कार्यकर्त्यांशी चांगले वागतील. शिरोडकर तर सहा वेळा शिरोडय़ातून निवडून आले आहेत. भाजपाचे काही माजी आमदार कार्यकर्त्यांशी चांगल्या प्रकारे वागले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.तेंडुलकर म्हणाले, की काँग्रेसमुक्त भारत ही भाजपची राष्ट्रीय स्तरावरील घोषणा आहे. त्याच पद्धतीने पक्ष पुढे जात आहे. काँग्रेसमधील जर कुणी आमच्या पक्षात येत असतील तर आम्ही त्यांना रोखू शकत नाही. यापुढे देखील आणखी तिघे काँग्रेस आमदार पक्ष सोडू शकतात. ते तिघे आमदार भाजपामध्ये, गोवा फॉरवर्डमध्ये की मगो पक्षात जातील ते आम्ही सांगू शकत नाही.तेंडुलकर म्हणाले, की काँग्रेस पक्ष सोडून आलेल्या शिरोडकर व सोपटे यांना आमच्या पक्षाने एकही पैसा दिलेला नाही. त्यांच्यासाठी पक्षाने एक देखील पैसा खर्च केला नाही. त्यांच्या विमानाचे तिकीटही त्यांनीच काढले व त्यांच्यासाठी हॉटेलची खोली आरक्षित देखील त्यांनी स्वत:च केली. भाजपाने केलेली नाही. खाण मालकाने पैसा दिला, असा चुकीचा प्रचार केला जात आहे.