शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

काटे-बायणा समुद्रात नौका उलटून एका कामगाराचा मृत्यू, तर दोघे जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 21:38 IST

शनिवारी (दि. २८) सकाळी बायणा समुद्रात मासे पकडण्यासाठी जात असलेली नौका किनाऱ्यापासून सुमारे ५० मीटर आत पोहोचल्यानंतर वादळी वा-यामुळे समुद्रात उलटून झालेल्या दुर्घटनेत नौकेवर असलेल्या ३३ वर्षीय सुरेश तांडेल याचा बुडून मृत्यू झाला

<p>वास्को: शनिवारी (दि. २८) सकाळी बायणा समुद्रात मासे पकडण्यासाठी जात असलेली नौका किनाऱ्यापासून सुमारे ५० मीटर आत पोहोचल्यानंतर वादळी वा-यामुळे समुद्रात उलटून झालेल्या दुर्घटनेत नौकेवर असलेल्या ३३ वर्षीय सुरेश तांडेल याचा बुडून मृत्यू झाला, तर अन्य दोन कामगार जखमी झाल्याने त्यांच्यावर इस्पितळात उपचार चालू आहे. समुद्रात उलटलेल्या ह्या मासेमारी नौकेवर घटनेच्या वेळी ९ कामगार असून घटना घडल्याचे किना-यावर असलेल्या स्थानिक मासेमा-यांना दिसून येताच त्यांनी त्वरित समुद्रात धाव घेऊन बुडणा-या सर्व कामगारांना बाहेर काढले, मात्र नंतर तांडेल याचा मृत्यू झाल्याचे इस्पितळात घोषित करण्यात आले.वास्को पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ७.३० च्या सुमारास सदर घटना घडली. नौका समुद्रात उलटल्याचे येथील स्थायिक मासेमा-यांना दिसून येताच त्यांनी त्वरित किना-यावर असलेल्या नौकेच्या मदतीने घटनास्थळावर जाऊन बुडत असलेल्या कामगारांना मदतीचा हात देऊन वर काढण्यास सुरुवात केली. स्थायिक मासेमा-याबरोबरच बायणा किना-यावर असलेल्या जीवरक्षकांनी जेटस्कीची मदत घेऊन नंतर बुडत असलेल्या ९ ही जणांना बाहेर काढून त्वरित उपचारासाठी बायणा येथे असलेल्या खासगी इस्पितळात नेले. इस्पितळात पोहोचण्यापूर्वीच सुरेश मृत्युमुखी पडल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सकाळच्या ह्या घटनेत ३७ वर्षीय मुन्ना जैस्वाल व ४५ वर्षीय पुतीया चलवादी हे जखमी झालेले असून त्यांच्यावर इस्पितळात सध्या उपचार चालू आहे.दरम्यान शुक्रवारी (दि.२७) सकाळी बायणा समुद्र किना-यावर अशाच प्रकारे अन्य एक मासेमारी नौका उलटून यात असलेल्या ११ कामगारांचा जीव धोक्यात आला होता. सदर घटना येथे असलेल्या जीवरक्षकांना दिसून येताच त्यांनी त्वरित समुद्रात धाव घेऊन नंतर बुडत असलेल्या सर्वांना सुखरुपरीत्या बाहेर काढले होते.