शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

स्मार्ट सिटीचे काम करताना ढिगाऱ्याखाली दबून कामगार मरण: रायबंदर येथील घटना

By पूजा प्रभूगावकर | Updated: October 16, 2023 13:37 IST

स्थानिकांकडून संताप व्यक्त

पणजी: रायबंदर येथे स्मार्ट सिटीचे काम सुरु असताना खड्डयातील मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका कामगाराचा दुर्देवी अंत आहे. यामुळे स्मार्ट सिटीचे नियोजनशुध्द काम उघड झाले असून या घटनेवर रायबंदरवासियांनी संताप व्यक्त केला आहे.

सदर घटना ही सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण विभाग ते विठ्ठल मंदिर दरम्यान स्मार्ट सिटी अंतर्गत सांडपणी प्रकल्पाची पाईपलाईन घालण्याचे काम सुरु आहे. त्यानुसार रस्त्याचे खोदकाम सुरु आहे. सदर काम सुरु असताना खड्डयात उतरलेल्या या कामगारावर मातीचा ढिगारा पडल्याने तो त्याखाली बदला गेला.सदर घटना घडताच जुने गोवे येथीलअग्नीशमन दलाला बोलावले. दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर तसेच जेसीबीच्या सहाय्याने माती बाजूला करुन या कामगाराला बाहेर काढले व १०८ रुग्णवाहिनीतून त्याला गोमेकॉत पाठवले. मात्र त्याला मृत घोषित केले. महत्वाचे म्हणजे जेव्हा सदर घटना घडली, तेव्हा याठिकाणी स्मार्ट टिसीचा एकही अधिकारी किंवा सुपरवायझर तेथे हजर नव्हता.

दरम्यान, स्मार्ट सिटीकडून बेशिस्तपणे तसेच नियोजनाअभावी काम केले जात आहे. घटना घडली तेव्हा रुग्णवाहिकेला सुध्दा दाखल होण्यावस वाट मिळत नव्हती. अखेर स्थानिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेला वाट करुन देण्यात आली. सदर प्रकारावार रायबंदरवासियांनी संताप व्यक्त केला असून जर कामगारांची सुरक्षा कामाच्या ठिकाणी जर स्मार्ट सिटी घेऊ शकत नाही, तर मग स्थानिकांची काय घेणार असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. कामगार मृत्यूप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली आहे.