शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

महिला काँग्रेसची केंद्रीय हस्तकला विकास आयुक्त कार्यालयावर धडक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 20:35 IST

चकली, चिवडा तसेच अन्य खाद्यपदार्थ बनवून स्वयंरोजगार करणा-या महिलांना केंद्रीय योजनेखाली कर्जाचा लाभ घेण्यासाठी कार्डे देण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी तसेच त्यांच्याशी गैर वागल्या प्रकरणी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील केंद्रीय हस्तकला विकास आयुक्त कार्यालयावर धडक दिली.  

पणजी : चकली, चिवडा तसेच अन्य खाद्यपदार्थ बनवून स्वयंरोजगार करणा-या महिलांना केंद्रीय योजनेखाली कर्जाचा लाभ घेण्यासाठी कार्डे देण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी तसेच त्यांच्याशी गैर वागल्या प्रकरणी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील केंद्रीय हस्तकला विकास आयुक्त कार्यालयावर धडक दिली.  काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो या कार्यकर्त्यांसह येथे आल्या असता पोलिसांनी त्यांना इमारतीच्या दारातच अडविले. शहरातील वैद्य इस्पितळाच्या इमारतीत हे कार्यालय असून रघुनाथ जाधव हे तेथे आयुक्त आहेत तर रवींद्र सिंह हे प्रमुख आहेत. आयुक्तांना घेराव घालण्याच्या उद्देशाने आलेल्या महिला कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी महिला पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ‘शरम करो, शरम करो’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्यावर काही वेळाने जाधव हे स्वत:च फाइल्स घेऊन खाली उतरले आणि कार्डे कयार असल्याचे व ती आज बुधवारीच पेडणे तालुक्यात वितरित केली जातील अस सांगितले. काही अर्ज प्रलंबित आहेत तेही निकालात काढले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रतिमा कुतिन्हो या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाल्या की, ‘ गेले आठ महिने उत्तर गोव्यातील ५५८ महिला कारागिरांची कार्डे आयुक्तांनी अडवून ठेवली होती. या महिला विचारणा करण्यासाठी जायच्या तेव्हा त्यांच्याशी गैर वागायचा. त्यांचे वैयक्तिक फोन क्रमांक मागायचा. केंद्र सरकारच्या योजनेतून कर्जाचा लाभ केवळ कार्डधारकांनाच मिळतो त्यामुळे या गरीब महिला कारागिरांसाठी ही कार्डे महत्त्वाची आहेत. ५00 अर्ज फेटाळण्यात आले होते तसेच लांच मागण्याचे प्रकारही या कार्यालयात घडलेले आहेत. या सर्व गोष्टींचा जाब विचारण्यासाठी आम्ही गेलो होतो परंतु इमारतीच्या दारातच आम्हाला अडविण्यात आले. या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन जाधव यांनी दिलेले आहे त्यामुळे आता आम्ही मागण्या पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहोत.’ आंदोलकांमध्ये महिला काँग्रेसच्या पणजी गटाध्यक्ष मुक्ता फोंडवेकर व अन्य महिला कार्यकर्त्यांचा समावेश होता. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस