शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हिजाबला आक्षेप घेतल्याने नेट परीक्षेला मुकली महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 20:18 IST

हिजाबला आक्षेप घेतल्याने नेट परीक्षेला मुकलेल्या महिलेने हे प्रकरण आता राज्य मानवी हक्क आयोग तसेच राज्य महिला आयोगाकडे नेले आहे.

पणजी : हिजाबला आक्षेप घेतल्याने नेट परीक्षेला मुकलेल्या महिलेने हे प्रकरण आता राज्य मानवी हक्क आयोग तसेच राज्य महिला आयोगाकडे नेले आहे. सफिना खान सौदागर (२४) या महिलेला गेल्या १८ रोजी झालेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेला (नेट) तिने डोक्यावरील हिजाब हटविण्यास नकार दिल्याने परीक्षेला बसू दिले नाही. तिने या प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोग तसेच राज्य महिला आयोगाकडे अधिकृत तक्रार केली आहे. तक्रारीत ते म्णते की, आपले वैयक्तिक स्वातंत्र्य आणि हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असा दावा तिने केला आहे. त्या म्हणतात की, ह्यघटनेच्या कलम २५ ते २८ ने धार्मिक रितीरिवाज पाळण्याचे आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आपण परिधान केलेल्या हिजाबला आक्षेप घेणे हा निव्वळ अत्याचार ठरतो.तक्रारीत तिने असाही दावा केला आहे की, नेटच्या संकेतस्थळावर कोणता वेष परिधान करावा याबाबत कोणतेही नियम नव्हते. शिवाय परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जावर लावलेला आपला फोटोही हिजाबमध्येच होता. आपला अर्ज स्वीकारण्यात आला त्यामुळे परीक्षा केंद्रावर हिजाबला आक्षेप घेण्याचे कारण नव्हते. आपण याआधीही नेट परीक्षेला बसले होते परंतु त्यावेळी आक्षेप घेतला नाही, आताच का? असा सवाल त्यांनी केला आहे. दरम्यान, उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता असे सांगण्यात आले की, परीक्षा घेण्याचे काम खाते करीत नसले तरी हे प्रकरण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या निदर्शनास आणले जाईल.