पणजी : विधानसभेचे पाच दिवसांचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. सभापतीपदाची निवडणूक मंगळवारी १२ रोजी तर उपसभापतीपदाची निवडणूक गुरुवारी १४ रोजी होणार आहे. अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नांवर फैलावर घेण्याची तयारी विरोधी काँग्रेस तसेच अपक्ष आमदारांनी केली आहे. माध्यम प्रश्न, २0२१चा प्रादेशिक आराखडा तसेच खाणींचा विषय गाजण्याची शक्यता आहे. माध्यम प्रश्नावर काँग्रेस पक्षाची अशी भूमिका आहे की, गोव्यातील पालक सुशिक्षित असून मुलांना कोणत्या माध्यमाच्या शाळेत घालावे याचा निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आहे. (पान २ वर)
विधानसभेचे आजपासून हिवाळी अधिवेशन
By admin | Updated: January 11, 2016 01:20 IST