शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

'गोव्यातील कला अकादमीची इमारत पाडणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 19:23 IST

गोविंद गावडेंची विधानसभेत नि:संदिग्ध ग्वाही; केवळ करणार दुरुस्ती

पणजी : गोव्याची शान असलेली कला अकादमीची इमारत पाडली जाणार नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी सोमवारी विधानसभेत दिली. यामुळे कला अकादमीच्या दुरवस्थेवरून केले जाणारे तर्कवितर्क आणि व्यक्त केल्या जाणाऱ्या शक्यतांना पूर्णविराम मिळाला. कला अकादमीचा पायाच ठिसूळ झाल्यामुळे काही भाग झाकलेला आहे. तसेच तेथे भरणारे वर्ग तसेच काही नियोजित कार्यक्रमांचे ठिकाण बदललेले आहे. या विषयावर माध्यमांत चर्चा सुरू आहे. यासंदर्भात गावडे यांनी स्पष्टीकरण दिले. कोणत्याही परिस्थितीत कला अकादमीची इमारत नष्ट केली जाणार नाही. त्या इमारतीबाबत गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अहवाल मिळालेला आहे. अकादमीची यथोचित दुरुस्ती केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कला अकादमी पाडून नवीन इमारत बांधली जाईल, असे शब्द मी कधीही वापरलेले नाहीत, असा खुलासा त्यांनी केला. कला अकादमी पाडून इमारत बांधण्याची स्वप्ने कोणी पाहत असेल तर सरकार तसे होऊ देणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. खारे पाणी, खारा वारा यामुळे अकादमीची थोडी हानी झालेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात जास्त त्रास होतो, अशी माहिती गावडे यांनी दिली. पावसाळ्यातच मराठी चित्रपट महोत्सव होत असतो. त्यासाठी महाराष्ट्रातील कलाकार मोठ्या संख्येने गोव्यात येत असतात. अशावेळी पंपाद्वारे पाण्याचा सतत उपसा करून पाणी बाहेर काढावे लागते. ही वस्तुस्थिती समजून घ्यावी, अशी विनंती त्यांनी सभागृहाला केली. 

टॅग्स :goaगोवा